FMCG सह ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समुळे मार्केट चार्ज ! पहिल्या सत्रात बाजारात तेजी

FMCG सह ऊर्जा क्षेत्रासह बँकांच्या शेअर्सनी पहिल्या सत्रात बाजारात चैतन्य परत खेचून आणले. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी चढाई केली, निफ्टी 15700 च्या जवळपास पोहचला. इंडसइंड बँक,HUL टॉप गेनर्स राहिले.

FMCG सह ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समुळे मार्केट चार्ज ! पहिल्या सत्रात बाजारात तेजी
शेअर बाजारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:04 AM

शेअर मार्केट न्यूज टुडेः आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात शेअर बाजारात FMCG सह ऊर्जा क्षेत्रासह बँकांच्या शेअर्सनी जान आणली. या शेअर्सनी गुंतवणुकदारांना पहिल्या सत्रात नफा मिळवून दिला. जागतिक बाजारातील (global market) सकारात्मक संकेतांनी भारतीय बाजारात(Share market) सेन्सेक्स 500 अंकांनी चढाई केली, निफ्टी 15700 च्या जवळपास पोहचला. इंडसइंड बँक,HUL टॉप गेनर्स (top gainers) राहिले. निफ्टी 163.50 अंकांनी र 15720.20 वर होता. इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, विप्रो, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट हे सेन्सेक्सवर वधरले. तर नेस्ले आणि एचडीएफसी (Nestle, HDFC) यांच्यात पडझड दिसून आली. बाजारपेठांमध्ये, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील चांगल्या अंकांनी पुढे गेले. जागतिक बाजारातील घडामोडी पथ्यावर पडल्याने गुंतवणुकदारांचा आज हुरुप वाढला होता. बाजारातील चढउताराचा सातत्याने कमाईवर परिणाम होत असल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तरी काही हाती गवसण्याची इच्छा बाळगणा-या शेअरधारकांना नफ्याची चोरटी धाव घेता आली.

जागतिक घडामोडींचा परिणाम

आशियातील सर्व बाजारात तेजी होती. हे बाजार 2 टक्क्यांपर्यंत वाढले. अमेरिकन बाजारावर मंदीचे सावट असल्याने इंधनाचे दर घसरले आहेत. त्याचा ही परिणाम आशियातील बाजारावर दिसून आला. आशियातील बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. त्यानंतर भारतीय बाजारातही चैतन्य आले आहे. निफ्टी बँक, फायनान्शिअल्स, खाजगी बँक आणि मीडिया यांच्या नेतृत्वाखाली नफा झाला. रिअॅल्टी, ऑटो, आयटी, एफएमसीजी, फार्मा हे इतर लक्षणीय वधारले.

हे सुद्धा वाचा

निफ्टीची 16000 अंकाकडे कूच ?

बाजारातील तज्ज्ञांनुसार, निफ्टी फ्युचर्स आता प्रीमियमवर व्यवहार करत आहेत आणि PCR-OI देखील 1 च्या जवळ आला आहे. ही बाब निफ्टीसाठी अत्यंत अनुकूल असून निफ्टी लवकरच 16000 अंकांचे लक्ष गाठेल. सध्या 15500 पुट आणि 16000 कॉल स्ट्राइक व्यापार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांना जास्त विश्वास आहे की 15400 – 15500 तात्काळ मागणी नोंदवेल. आज 15700 अंकांवर बाजार टिकून राहिला तर तो 16000 अंकाकडे कूच करेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसे जर झाले तर बाजारात पुन्हा नवचैतन्य परतेल.

मोटारकॉर्पचा शेअर वाढला

कंपनीने 1 जुलैपासून आपल्या मोटरसायकली आणि स्कूटर्सच्या एक्स-शोरूम किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे Hero MotoCorp चे शेअर्स 1% वाढले आहेत. 3,000 रुपयांपर्यंत ही किंमत वाढ असेल. विशिष्ट मॉडेल आणि बाजाराच्या अधीन राहुन किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. या घडामोडीचा बाजारावर परिणाम दिसून येणार आहे. शेअर पुन्हा किती वधरले आणि गुतवणुकदारांना त्याचा काय फायदा होईल हे येत्या काही दिवसात समजेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.