अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

Share Market | रामा फॉस्फेट ही कंपनी खतांचे उत्पादन करते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रामा फॉस्फेटच्या समभागाचा भाव 264.55 रुपयांवरुन 301.60 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत या समभागाची किंमत जवळपास 14 टक्क्यांनी वधारली आहे.

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 12:32 PM

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे रामा फॉस्फेट (Rama Phosphates). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.

रामा फॉस्फेट ही कंपनी खतांचे उत्पादन करते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रामा फॉस्फेटच्या समभागाचा भाव 264.55 रुपयांवरुन 301.60 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत या समभागाची किंमत जवळपास 14 टक्क्यांनी वधारली आहे.

2001 मध्ये रामा फॉस्फेटच्या समभागाची किंमत अवघी 1.55 रुपये

2001 मध्ये रामा फॉस्फेटच्या एका समभागाची किंमत 1.55 रुपये इतकी होती. गेल्या 20 वर्षांत या कंपनीने गुंतणूकदारांना नेहमीच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे आता या समभागाची किंमत 306 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यात रामा फॉस्फेटच्या शेअर्सची किंमत 14 टक्के तर गेल्या सहा महिन्यांत 113 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणुकदाराने या समभागांमध्ये तीन महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य 1.14 लाख इतके झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी एक लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे मूल्य 2.13 लाख रुपये इतके झाले आहे. तर 20 वर्षांपूर्वी 1.55 रुपयांना असणाऱ्या या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य 1.97 कोटींच्या आसपास आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.