High Return Stocks: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात 5 लाखाचे झाले 32.95 लाख
Share Market | या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना अक्षरश: मालामाल केले आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने गुंतणुकदारांना जवळपास 560 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
मुंबई: गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची प्रकृती तोळामासा झाली आहे. मात्र, या संपूर्ण काळात शेअर बाजार मात्र जोरदार घोडदौड करताना दिसत आहे. आतादेखील शेअर बाजाराचे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी हे निर्देशांक विक्रमी पातळीच्या जवळपास आहेत. (Laurus Labs share give high returns to investors)
गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. यामध्ये लॉरस लॅब (Laurus Labs) या कंपनीचा समभाग चर्चेचा विषय ठरत आहे. या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना अक्षरश: मालामाल केले आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने गुंतणुकदारांना जवळपास 560 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
29 जून 2020 रोजी लॉरस लॅब कंपनीच्या समभागाची किंमत 103 रुपये इतकी होती. मात्र, आज वर्षभरानंतर याच समभागाची किंमत 678.90 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये लॉरस लॅब 682 रुपयांपर्यंत वर जाऊन आला आहे. याचा अर्थ वर्षभरात या समभागाने गुंतवणुकदारांना 559 टक्के परतावा मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी तुम्ही लॉरेस लॅबचे पाच लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्याची किंमत साधारण 32.95 लाख रुपये इतकी आहे.
लॉरेस लॅब ही फार्मा कंपनी आहे. जेनरिक औषधांचे उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या 9 कंपन्यांना लॉरेस लॅब कंपनीकडून कच्च्या मालाचा (Active Pharmaceutical Ingredients) पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 110.15 कोटी इतका होता. हाच नफा यंदाच्या मार्च तिमाहीत 296.92 कोटी रुपये इतका झाला होता.
संबंधित बातम्या:
शेअर बाजारात आज दोन कंपन्यांची नोंद, पहिल्याच दिवशी कमावला 42 टक्के नफा
(Laurus Labs share give high returns to investors)