Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : 90 दिवसांत कमावले 25 कोटी! ओळखा बरं हा गुंतवणूकदार

Share Market : या शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. शेअर बाजारात अनेक जबरी गुंतवणूकदार आहे. या गुंतवणूकदाराने तर जोरदार कमाई केली. त्यांनी गुंतवलेल्या या स्टॉकने जोरदार मुसंडी मारल्याने त्यांना 90 दिवसांत 25 कोटींचा फायदा झाला. कोण आहे हा गुंतवणूकदार, यापूर्वी पण त्यांनी अशीच केली होती कमाई

Share Market : 90 दिवसांत कमावले 25 कोटी! ओळखा बरं हा गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 10:55 AM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) कोणाचे कधी, कसे नशीब चमकेल सांगता येत नाही. शेअर बाजारात ज्याने जोखीम स्वीकारली त्याने बाजार ओळखला असे म्हणतात. आताच गुंतवणूक केली आणि लागलीच छप्परफाड कमाई (Bumper Return) केली असं कधी होत नाही. कंपनी, शेअर बाजाराचा अभ्यास केल्याशिवाय या जोखीमच्या अथांग महासागरात उडी घ्यायची नसते. पट्टीच्या पोहणाऱ्यांना यातील धोके माहिती असतात. तर अशाच एका गुंतवणूकदाराने लांब सूर मारला आहे. त्याला 90 दिवसांत छप्परफाड कमाई करता आली आहे. या कंपनीत केलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरली. तीन महिन्यातच त्यांनी 25 कोटी छापले. कोण आहे हा गुंतवणूकदार

आशिष कचोलिया यांना लॉटरी

आशिष कचोलिया हे बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या नावावर यापूर्वी पण अनेक रेकॉर्ड आहेत. त्यांचा पोर्टफोलिओ पण अनेक जण फॉलो करतात. ते बाजारातील मोजक्या यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी बाजाराच्या भरवशावर आतापर्यंत 2000 कोटींची संपत्ती उभी केली आहे. एका स्मॉल कॅप स्टॉकने त्यांना तीन महिन्यातच ही लॉटरी लावली आहे. त्यांनी 25 कोटींची कमाई केली. या स्टॉकने सहा महिन्यात 134.71 टक्क्यांची उसळी घेतली आहे. हा स्टॉक 232 टक्क्यांनी या वर्षी वधारला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणती आहे ही कंपनी

Balu Forge असं या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे आशिष कचोलिया यांच्याकडे 21,65,500 शेअर आहेत. त्यांनी या शेअरची किंमत 115.45 इतकी असताना ही खरेदी केली होती. आज या शेअरची किंमत 230.45 रुपये आहे. ही कंपनी बेलगममध्ये 1990 मध्ये स्थापन झाली होती. ही कंपनी वाहनांसाठी crankshafts तयार करते.

यापूर्वी या कंपनीतून कमाई

GRAVITA INDIA LTD या शेअरने पण त्यांना मालामाल केले होते. गेल्या महिन्यात हा मल्टिबॅगर शेअर 154.25 पॉईंटने वधारला होता. या शेअरने 52-आठवड्यातील उच्चांक गाठला होता. 960 रुपयांवर हा शेअर पोहचला गेल्यावेळी पोहचला होता. सध्या हा शेअर 920 रुपयांच्या घरात आहे. या एकट्या शेअरच्या जोरावर दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी गेल्या महिन्यात 22 कोटींहून अधिकची कमाई केली होती. त्यांच्याकडे या कंपनीचे 14,84,399 शेअर आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.