Share Market : सुपरस्टार रजनीकांत यांच्यामुळे झाला चमत्कार! या शेअरला लागले चारचांद

Share Market : सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. या सिनेमामुळे शेअर बाजारात या कंपनीच्या स्टॉकला उभारी मिळाली आहे. हा शेअर चमकला आहे. थलायवाच्या बुस्टर डोसमुळे हा शेअर बाजारात सूसाट धावला. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

Share Market : सुपरस्टार रजनीकांत यांच्यामुळे झाला चमत्कार! या शेअरला लागले चारचांद
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 4:31 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : भारतीय चित्रपट सृष्टीत सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajnikant) यांच्या नावाचे तुफान सगळ्यांनाच माहिती आहे. या तुफानाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि कायम केले. रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करतात. त्यांचे चाहते जगभर आहेत. वयाला पण त्यांनी मागे टाकले आहे. त्यांची खास स्टाईल, संवाद फेक यामुळे चित्रपट हिट होतो. वयाच्या 72 व्या वर्षी पण ते केवळ प्रमुख भूमिका निभावत नाहीत तर गल्ला पण जमवितात. त्यांच्या चित्रपटावर कोट्यवधींचा खर्च होतो आणि ते त्यापेक्षा पण अधिकची कमाई करुन देतात. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड इतिहासजमा करतात. त्यांचे नाव आता शेअर बाजारात (Share Market) पण गाजत आहे. त्यांच्यामुळे या कंपनीच्या शेअरने ताबडतोब उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Jailer मुळे आले तुफान

मीडिया कंपनी सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडचा शेअर सध्या रॉकेट झाला आहे. चेन्नईत या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीचे रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. नुकतीच रिलीज झालेली फिल्म जेलर सन पिक्चर्सने तयार केला आहे. ही सन टीव्ही नेटवर्कचीच दुसरी कंपनी आहे. या चित्रपटात रजनीकांत हे प्रमुख भूमिकेत आहेत. एका महिन्यात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

असा चढला शेअरचा भाव

रजनीकांत यांचा जेलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शीत झाला. या चित्रपटाने मोठा गल्ला कमावला. त्यामुळे सन टीव्हीच्या शेअरने पण जोरदार कामगिरी केली. या शेअरमध्ये उसळी दिसून आली. जेलर सिनेमाचा टिझर आल्यापासूनच या चित्रपटाच्या शेअरमध्ये हालचाल दिसून आली. चित्रपट प्रदर्शीत झाल्यापासून शेअर चांगलाच वधारला.

शेअरमध्ये मोठी उसळी

हा शेअर बुधवारी 613 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा शेअर 0.55 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 616.25 रुपयांवर ट्रेड करत होता. 10 ऑगस्टनंतर या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा शेअर जवळपास 12 टक्क्यांनी तर 30 जूनपासून आतापर्यंत 40 टक्क्यांहून अधिक धावला आहे. येत्या काही दिवसांत हा शेअर मोठी घौडदौड करु शकतो.

600 कोटींचा टप्पा ओलांडला

रजनीकांत यांच्या या चित्रपटाने कमाईत मोठा पल्ला गाठला आहे. शेअरचे भाव जबरदस्त तेजीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने मोठा नफा कमावला. त्याचा ही परिणाम शेअरवर दिसून आला. या कंपनीला चांगला फायदा झाला. जेलर चित्रपटाने भारतात 320 कोटी रुपयांची कमाई केली तर वर्ल्डवाईड या चित्रपटाने 600 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

कमाई सुरुच

बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुले ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सन टीव्ही अजून जोरदार कामगिरी करु शकते. चित्रपटगृहात हाऊसफुलचे बोर्ड अजूनही खाली उतरलेले नाही. हा चित्रपट अजूनही कमाल दाखवत आहे. त्यामुळे कमाईचा आकडा वाढू शकतो. त्याचा फायदा थेट सन टीव्हीला होईल. या सिनेमाचे हिंदी भाषेतील हक्क नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे. त्यासाठी त्यांनी जवळपास 100 कोटी रुपये मोजल्याचे सांगण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.