Share Market : निर्देशांकाची जोरदार घौडदौड, पहिल्यांदा पार केला 63 हजारांचा टप्पा, आठवडाभरात गुंतवणूकदार झाले मालामाल..
Share Market : शेअर बाजाराने जोरदार घौडदौड सुरु केली आहे..
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने (Indian Share Market) जोरदार घौडदौड सुरु केली आहे. निर्देशांक (Sensex) दररोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना BSE, Nifty ची पडलेली मोहिनी, चीनने लॉकडाऊन समाप्त करण्याची केलेली घोषणा याचा परिणाम बाजारावर दिसून आला. बुधवारी बाजार 400 अंकांनी (Share Market Hike) उसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली.
इतिहासात पहिल्यांदाच निर्देशांकाने (Sensex) 63 हजार अंकांचा टप्पा पार केला. तर दुसरीकडे निफ्टीने (Nifty) नवीन विक्रम प्रस्थापित केला, निर्देशांक 18,758 अंकावर बंद झाला. निर्देशांकाची ही घौडदौड अशीच कायम राहिल्यास पुन्हा एखादा विक्रम प्रस्थापित होऊ शकतो.
या 21 नोव्हेंबरपासून शेअर बाजारात जवळपास 2 हजार अंकांची तेजी दिसून आली. तर निफ्टीत जवळपास 600 अंकांची वृद्धी दिसून आली. तर गुंतवणूकदारांना या दरम्यान 7.50 लाख कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाला. या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) निर्देशांकाने पहिल्यांदा 63 हजार अंकांचा टप्पा पार केला. निर्देशांकात आज 417.81 अंकांची वृद्धी दिसून आली. निर्देशांक 63,099.65 अंकावर बंद झाला. तर व्यापारी सत्रात निर्देशांक 63,303.01 अंकासह सर्वकालीन उच्चांकावर (Sensex All-time High) होता.
गेल्या सात दिवसांच्या व्यापारी सत्रात निर्देशांकात 1954.81 अंकांची वृद्धी दिसून आली. 21 नोव्हेंबर रोजी निर्देशांक 61,144.84 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर सातत्याने निर्देशांकाची जोरदार कामगिरी दिसून आली. निर्देशांकात 3.19 टक्क्यांची तेजी दिसून आली.
दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) ही जोरदार उडी घेतली. व्यापारी सत्रात निफ्टी 18,816.05 अंकांसह सर्वकालीन उच्चांकी पातळीवर होता. 140.30 अंकांच्या वृद्धीसह निफ्टी 18,758.35 अंकांवर बंद झाला. 21 नोव्हेंबर नंतर निफ्टीने 3 टक्क्यांची उसळी नोंदवली आहे.
21 नोव्हेंबर रोजी निफ्टी 18,159.95 अंकांवर बंद झाला. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरच्या अखेरपर्यंत निफ्टी 19 हजार अंकांचा टप्पा सहज पार करेल. त्यामुळे गुंतवणूकदारांची लवकरच चांदी होणार आहे. काही गुंतवणूकदारांना जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे.