Share Market Tips | जुगार कसाला, असा पैसा कमवा, शेअर बाजारात गिरवा हा ‘मंत्र’

Share Market Tips | शेअर बाजार हा भूल भुलैया आहे, ही गुंतवणूक म्हणजे जुगार अशा अनेक कल्पना आहे. बाजारात हौसे-नवसे-गवसे हे तीन प्रकारचे लोक येतात. पण काहींना त्यात कुठे आणि कशी गुंतवणूक करावी, कसा पैसा मिळवावा हे कळत नाही. तुमचा अभ्यास, तज्ज्ञांचे मत महत्वाचे आहे.

Share Market Tips | जुगार कसाला, असा पैसा कमवा, शेअर बाजारात गिरवा हा 'मंत्र'
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : पैसे कमविणे कोणाला नको आहे. शेअर बाजारात खूप पैसा असल्याचे बोलले जाते. हा अथांग महासागर असून ज्याला जमले तो तसा पैसा कमावतो, असे बोलल्या जाते. काहींनी तर शेअर बाजारात अवघ्या 5000 रुपयांपासून सुरुवात केली आहे. शेअर बाजारात अब्जावधींची उलाढाल होते. काही गुंतवणूकदार तर बाजारातून कोट्यवधींची कमाई करत आहे. त्यांना पाहून अनेकांना हेवा वाटतो, बाजारातून ही मंडळी कशी कमाई करतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. खरंतर काही बाबी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही लखपती, करोडपती होता येते. पण अनेकदा गुंतवणूकदार झटपट पैसा कमाविण्याच्या स्पर्धेत जोखीम विसरतात आणि त्यांना फटका बसतो. पण या गोष्टी लक्षात ठेवल्यास कमाई करता येऊ शकते.

  1. सुरुवात कराल कशी – शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात कसे काम करतात, कशी कमाई होते, याची नीट माहिती घ्या. डिजिटल युगात तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही माहिती मिळवू शकता. त्यासाठी अर्थतज्ज्ञाची मदत पण घेऊ शकता.
  2. छोट्या रक्कमेतून करा सुरुवात – शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठ्या रक्कमेची गरज नाही. अनेक लोक हीच चूक करतात. काही जण तर कर्ज काढण्याची घोडचूक करतात. छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही सुरुवात केल्यास बाजारातील चढउताराचा अंदाज येतो. एकदा अनुभव गाठीशी आला की मोठी रक्कम गुंतवा.
  3. मोठ्या आमिषाला बळी पडू नका – पहिल्याच दिवशी एक लाख रुपये रिटर्न मिळाला पाहिजे, या मानसिकतेतून बाहेर पडा. रिटर्नचा चक्कर सोडून चांगल्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा. गुंतवणुकीची सुरुवात लार्ज कॅप कंपन्यांच्या माध्यमातून करा. काही वर्षांचा अनुभव आला की जोखीम उचला.
  4. गुंतवणूक करत रहा- एकदाच गुंतवणूक करुन बाजूला होऊ नका. दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करा. त्यासाठी चांगल्या स्टॉकची माहिती काढा, त्यांची कामगिरी पहा. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या गुंतवणूकीतून चांगला फायदा होतो.
  5. हे सुद्धा वाचा
  6. पेनी स्टॉकपासून चार हात लांब- पेनी स्टॉक हे सर्वात जोखमीचे मानण्यात येतात. 10-15 रुपयांचे स्टॉक्स आपल्याला भूरळ पाडतात. पण त्यांची खरेदी ही कधीकधी फसवी ठरते. हे पैसा जमवून गाशा गुंडाळतात. तर काही पेनी स्टॉक लांबचा पल्ला पण गाठतात. त्यासाठी गुंतवणूक तज्ज्ञा सल्ला आवश्य घ्या. ज्या कंपन्या व्यवसायात घौडदौड करतात, त्यांचाच पेनी स्टॉक मल्टिबॅगर ठरतो.
  7. घसरणीला घाबरु नका – शेअर बाजारात घसरणीचे सत्र असले की, गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण अनेक नवीन गुंतवणूकदार बिचकतात अथवा शेअर्सची विक्री करतात. तर मोठे गुंतवणूकदार बाजार घसरण्याची वाट पाहतात.

  • कमाईतील काही वाटा बाजूला ठेवा – शेअर बाजारातील कमाईचा काही वाटा बाजूला काढून ठेवा. नफा चांगला झाल्यास, त्यातील रक्कम बाजूला ठेवा. तर काही रक्कम गुंतवणुकीसाठी वापरा.
Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.