Share Market : शेअर बाजारातही फटाके, काही शेअर्सने दिली विजयाची सलामी तर काहींचा लागला निकाल..

Share Market : शेअर बाजारावरही निवडणुकांच्या निकालांचा परिणाम दिसून आला..

Share Market : शेअर बाजारातही फटाके, काही शेअर्सने दिली विजयाची सलामी तर काहींचा लागला निकाल..
बाजारावरही निकालांचा परिणामImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 5:32 PM

नवी दिल्ली : सध्या गुजरात (Gujarat Election Result) आणि हिमाचल प्रदेश निवणुकांच्या आलेल्या निकालांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता चित्र एकदम स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे तर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh Election Result) काँग्रेसचे पारडे जड आहे. आप पक्षाला म्हणावी तशी कामगिरी बजाविता आली नाही. निवडणुकांचे निकाल येत होते, तसा शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत होता. सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजार (Share Market) सुस्तावला होता. पण दिवसभराच्या उलाढालीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आगेकूच केली.

गुरूवारी दिवसभर बाजारात चढउतार होत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 160.00 अंकांनी म्हणजे 0.26 टक्क्यांच्या तेजीने 62,570.68 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज-निफ्टीने 48.85 अंकांची (0.26 टक्के) आघाडी घेत 18,609.35 वर बंद झाला.

आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण भांडवल 2,89,70,942.63 कोटी रुपये झाले. दिवसभरातील चढउतारानंतर अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, मारुती, एचडीएफसी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरने वृद्धी नोंदवली.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक, एनटीपीसी, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डी, बजाज फायनान्स, विप्रो, नेस्ले इंडिया, टीसीएस, कोटक बँक, पावर ग्रीड आणि सन फार्माच्या शेअरला कामगिरी दाखविता आली नाही.

गुरुवारी निफ्टी आयटी, फार्मा आणि रिअॅल्टी शेअरमध्ये घसरण झाली. तर बँक, ऑटो, फायनान्स सर्व्हिस, एफएमसीजी, मीडिया, मेटल, पीएसयू बँक आणि प्रायव्हेट बँकेच्या शेअरमध्ये आज वृद्धी दिसून आली. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया चार पैशांनी वधरला आणि 82.43 वर पोहचला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.