SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण

गुंतवणुकदारांच्या प्रॉफिट बुकिंग धोरणामुळे एचडीएफसी बँक, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एचडीएफसीत सर्वाधिक घसरण झाली. रिलायन्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (PROFIT BOOKING) 1.41 टक्के घसरण नोंदविली गेली.

SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण
शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्रImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:28 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील (SHARE MARKET) तेजीच्या सत्राला आज ब्रेक लागला. आज (मंगळवार) प्रॉफिट बुकिंगमुळे घसरणीला सामोरं जावं लागलं. सेन्सेक्स 435 अंकांच्या घरसणीसह 60176 च्या स्तरावर पोहोचला. निफ्टीत 96 अंकांच्या घसरणीसह 17957 वर बंद झाला. आज सेन्सेक्स वर टॉप-30 पैकी 13 शेअरमध्ये तेजी आणि 17 शेअर्समध्ये घसरण झाली. गुंतवणुकदारांच्या प्रॉफिट बुकिंग धोरणामुळे एचडीएफसी बँक, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एचडीएफसीत सर्वाधिक घसरण झाली. रिलायन्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (PROFIT BOOKING) 1.41 टक्के घसरण नोंदविली गेली. एचडीएफसी बँक 2.98 आणि एचडीएफसी 2.12 टक्क्यांनी घसरण झाली. बीएसईवर सूचीबद्ध (BSE LISTED) (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप 273.68 लाखावर बंद झाला. आजच्या घसरणीत निफ्टी बँक, फायनान्शियल्स सर्व्हिस आणि खासगी बँकाचा समावेश झाला.

काल अप, आज डाउन

काल शेअरबाजार तीन महिन्यांच्या सर्वोच्च वाढीसह बंद झाला होता. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेत गेल्या 13 वर्षातील सर्वाधिक तेजी नोंदविली गेली होती. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे निफ्टी बँक 4 टक्क्यांच्या तेजीसह 38635 अंकांवर बंद झाली होती.

प्रॉफिट बुकिंग (नफा वसुली) म्हणजे काय?

शेअर बाजारात ‘प्रॉफिट बुकिंग’ (नफा वसुली) सर्वाधिक महत्व दिलं जातं. नफ्याची प्राप्ती करण्यासाठी शेअर बाजारात प्रत्येकाचा कल असतो. दीर्घकालीन गुंतवणूकदार देखील नफा बुकिंगचे धोरण अमलात आणताना दिसतात. योग्य वेळी प्रॉफिट बुकिंग न केल्यास वाढलेल्या शेअरच्या किंमती पुन्हा घसरण्याचा संभव असतो. शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र सुरू असते. त्यामुळे बाजार अस्थिरतेच्या काळात शेअर गुंतवणुकदारांची चलबिचल सुरू असते. दरम्यान, प्रॉफिट बुकिंग करून संभाव्य अनिश्चिततेची जोखीम टाळण्याचा गुंतवणुकदारांचा प्रयत्न असतो.

आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top Gainers)

• अदानी पोर्ट्स (3.60%) • एनटीपीसी (3.33%) • टाटा मोटर्स (2.53%) • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (2.48%) • टाटा कॉन्स.प्रॉडक्ट (2.35%)

आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)

• एचडीएफसी बँक (-2.93%) • बजाज फिनसर्व्ह (-2.20%) • एचडीएफसी (-2.10%) • कोटक महिंद्रा (-1.84%) • इंड्सइंड बँक (-1.41%)

संबंधित बातम्या

Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट

IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर 121.6 कोटींचे कर्ज, विद्यार्थी कर्ज कसे फेडणार; केंद्र सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.