Share Market Updates : शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्स वधारला, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

आज शेअर बाजार (Share market) सुरू होताच पहिल्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. सेंसेक्समध्ये (Sensex) 278 अंकाची वाढ झाली तर निफ्टी देखील 87 अंकांनी वधारला. सेंसेक्स 278 अंकांच्या वाढीसह 56741 वर पोहोचला.

Share Market Updates : शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्स वधारला, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:36 AM

आज शेअर बाजार (Share market) सुरू होताच पहिल्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. सेंसेक्समध्ये (Sensex) 278 अंकाची वाढ झाली तर निफ्टी देखील 87 अंकांनी वधारला. सेंसेक्स 278 अंकांच्या वाढीसह 56741 वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) 87 अंकाच्या वाढीसह 17045 वर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरणीचे सत्र सुरूच आहे. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेंसेक्स तब्बल 1200 अकांनी कोसळला होता. तर मंगळवारी देखील सेंसेक्स 700 अंकांनी घसरल्याचे पहायला मिळाले. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केट हे घसरणीसह बंद होत आहे. गेल्या पाच दिवसांत सेंसेक्समध्ये तब्बल 2984 अंकाची घसरण झाल्यचे समोर आले आहे. शेअर बाजारामध्ये घसरणीचे सत्र सुरूच असल्यामुळे गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांना जवळपास 8 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एप्रिल महिन्याबाबत बोलायचे झाल्यास आठ एप्रिल सोडल्यास आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये पडझडच दिसून आली आहे.

27 कंपन्यांचे शेअर तेजीत

आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात टॉप 30 शेअरपैकी 27 शेअर हे तेजीत दिसून येत होते. तर तीन शेअरच्या मुल्यात घसरण झाल्यचे पहायला मिळाले. कोटक महिंद्रा बँक, इंन्डसलॅंड बँक आणि बजाज फायन्सासच्या शेअरमध्ये घसरण झाली. तर दुसरीकडे महिंद्रा , महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. आज एचडीएफसी, एचडीएफडी बँक आणि रिलायन्सचे शेअर्स देखील तेजीत आहेत. सलग दोन दिवसांच्या मंदीनंतर आज एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअरमध्ये तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. सलग दोन दिवसांच्या पडझडीनंतर आज इन्फोसिसचा शेअर्स देखील तेजीत आहे.

बऱ्याच दिवसांनंतर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी

तब्बल 9 दिवसांनंतर आज एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. आज एचडीएफसी बँकेचे शेअर्स वधारल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र मागच्या दोन दिवसांचा रेकॉर्ड पहाता अद्यापही गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम आहे. तर दुसरीकडे रिलायन्सचे शेअर्स देखील वधारले असून, रिलायन्सच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Gautam Adani: 2 वर्षात 300 टक्क्यांनी संपत्तीत वाढ! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी गौतम अदानी सज्ज

वर्षभरात मिळणार ‘गेमिंग’ व्यवसायात एक लाखाहून अधिक नोकऱ्या.. गृहिणी, शिक्षक, सुशिक्षीत युवकांना ‘असाइनमेंट’ बेस काम

Volvo Car: आलिशान वोल्वो कारची किंमत तब्बल तीन लाखांनी वाढली! आता नेमकी किंमत किती? जाणून घ्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.