शेअर मार्केटमध्ये खळबळ, 13 रूपयाचा शेअर थेट 800 पुढे, गुंतवणूकदार झाले करोडपती
Stock Market Update : शेअर मार्केटमध्ये गुंतणूकदार लखपती सोडा करोडपती झालेत. एका शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत मालामाल केलं आहे. 13 रूपायांच्या शेअर्सने थेट गुंतवणूकदारांना जवळपास करोडोपती पोहोचवलं आहे.
मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज तेजी आलेली दिसली. स्मॉलकॅपमधील गुंतवणूकदारांना काही शेअर्सने मालामाल केलं. एक असा शेअर जो साडेतीन वर्षामध्ये दुप्पट तिप्पट नाहीतर साठ पटीने वाढला आहे. गुंतवणूकदाराने यामध्ये लाख रूपये लावले होते ते जवळपास करोडपती झाले आहेत. कारण 13 रूपयांवरून शेअर्सची किंमत थेट 870 रूपये झाली आहे. कोणता आहे हा शेअर जाणून घ्या.
गुंतवणूकदार झाले करोडपती
स्मॉलकॅप कंपनी Waaree Technologies आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. Waaree Technologies शेअरची 3 सप्टेंबर 2020 रोजी 13.71 किंमत होती आता हा एक शेअर 874 रूपयांना झाला विचार करा. तीन वर्षात या शेअरने दुप्पट तिप्पट नाहीतर साठपटीने पैसा मिळवून दिला आहे. 2020 साली गुंतवणूकदारांना 2:5 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देखील दिले.
पाच शेअर्समागे दोन बोनस शेअर्स देण्यात आले होते. जर 2020 साली गुंतवणूकदाराकडे लाख रूपयांचे शेअर्स असतील त्यांना 7393 शेअर्स मिळाले. यामध्ये बोनस शेअर्स जोडले तर एकूण 10210 शेअर्स झाले. आता या शेअर्सची बाजारात 89.25 किंमत आहे.
दरम्यान, एका वर्षामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 455 % वाढ झाली आहे. 4 जानेवारी 2023 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंंमत 157 होती. आता एक वर्षात एका या शेअर्सची किंमत 874 झाली आहे. एक वर्षामधील गेल्या सहा महिन्यांमध्येत 98 % शेअर्सची किंमत वाढली आहे. एक महिन्यातही शेअर्सची किंमत मजबूत वाढली आहे.