Share Market : शेअर बाजार सूसाट धावणार की होणार धडामधूम! जाणून घ्या बाजाराचा मूड
Share Market : गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 500.65 अंक वा 0.77 टक्क्यांनी वधारला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, निफ्टी 169.5 अंक वा 0.87 टक्क्यांनी उसळला. आता येत्या आठवड्यात आर्थिक वाटचाल, जागतिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची चाल हे बाजाराची दिशा ठरवतील.
नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने (Share Market) गुडन्यूज दिली. त्यापूर्वी पाच आठवड्यात घसरणीचे सत्र सुरु होते. त्याला पहिल्यांदा ब्रेक लागला. शुक्रवारी बाजाराने चांगली आगेकूच केली. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 500.65 अंक वा 0.77 टक्क्यांनी वधारला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, निफ्टीने (Nifty) 169.5 अंक वा 0.87 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. अर्थात डॉलर कमकुवत झाल्याने त्याचा फायदा सोने-चांदीच्या दरवाढीला होत आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार सोने-चांदीत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. सध्या चीन तांब्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहे. आता येत्या आठवड्यात आर्थिक वाटचाल, जागतिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची चाल हे बाजाराची दिशा ठरवतील.
या जागतिक घाडमोडींचा दिसेल परिणाम
- चीनच्या रिअल इस्टेस्ट सेक्टर अडचणीत सापडले आहे.
- डॉलर सूचकांकमध्ये चढउतार सुरु आहे. डॉलर कमकुवत झाला आहे.
- अमेरिकन बाँड आठवड्यात काय कामगिरी करतो, त्यावर पुढील दिशा ठरेल.
- S&P, ग्लोबल पीएमआय, अमेरिकेतील बरोजगारीचे आकडे, महागाईवरची भूमिका महत्वाची असेल.
- अमेरिकेतील फॅक्टरीतील ऑर्डर, पुरवठा किती याचे आकडे समोर येतील.
- युरो झोनमधील घडामोडी महत्वाच्या ठरतील. दुसऱ्या तिमाहीचा जीडीपी आकडा समोर येईल.
- कच्चा तेलाचे आकडे वाढतात का, ओपेक देशांची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रुपयाची झेप किती
जागतिक बाजाराचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून येत आहे. अमेरिकेतील पेरोल आणि पीएमआय आकडे समोर येतील. याशिवाय कच्चा तेलाच्या भावाचा परिणाम दिसून येईल. डॉलर घसरला आहे. पण रुपया डॉलर पेक्षा अजूनही मजबूत स्थिती नाही. या आठवड्यात रुपयाची चाल काय असेल यावर बाजाराची दिशा ठरेल. रुपयाची घसरण थांबली तर बाजाराला दिलासा मिळू शकतो.
परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका
जागतिक बाजारात अनेक अर्थव्यवस्था सुस्तावल्या आहेत. त्यांना मोठी झेप घेता आली नाही. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जोमाने आगेकूच करत आहे. भारतीय बाजाराकडून मोठ्या अपेक्षा आणि आशा आहेत. परदेशी पाहुणे पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात पैसा ओततील अशी शक्यता आहे. गेल्या पाच व्यापारी सत्रात परदेशी पाहुण्यांनी पळ काढला होता. पण गेल्या आठवड्यापासून चित्र पाटले आहे. भारतीय जीडीपीने या तिमाहीत मजबूत घरवापसी केली आहे. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा नाही. पण इतर अर्थव्यवस्थेपेक्षा हा आकडा दिलासादायक आहे. या सर्वांचा परिणाम बाजारावर दिसून येईल.