Share Market: ‘या’ बड्या कंपनीच्या शेअरची किंमत होणार शून्य, कारण…
Videocon groups shares | व्हीडिओकॉन समूहाचे एकूण मूल्य कर्जदारांचे पैसे फेडण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे इक्विटी शेअरधारकांना कंपनी कोणताही लाभ देऊ शकत नाही, असे व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई: कर्जात बुडालेल्या व्हीडिओकॉन कंपनीचे शेअर बाजारातील अस्तित्व लवकरच संपुष्टात येणार आहे. शेअर बाजारात सध्या व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड दोन कंपन्या सूचिबद्ध आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत या दोन्ही कंपन्यांच्या शेअरची किंमत शून्य होणार आहे. या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. त्यामुळे आता शेअर बाजारातील या कंपन्यांची सूचिबद्धता संपुष्टात येणार आहे. (Shareholders of videocon will not get anything know the reason)
व्हीडिओकॉन समूहाकडून यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभागधारकांना सूचीबद्धता समाप्त झाल्यानंतर कोणताही लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
कंपन्या शेअर बाजारातून का डिलिस्ट होणार?
व्हीडिओकॉन समूहाचे एकूण मूल्य कर्जदारांचे पैसे फेडण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे इक्विटी शेअरधारकांना कंपनी कोणताही लाभ देऊ शकत नाही, असे व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे. तर व्हीडिओकॉन इंडस्ट्रीज ही कंपनीही 18 जुनपासून BSE आणि NSE दोन्ही बाजारांमधून डिलिस्ट होणार आहे. अनिल अग्रवाल यांची Twin Star Technologies व्हीडिओकॉन कंपनी विकत घेणार आहे. हा सौदा साधारण 3000 कोटी रुपयांचा असेल.यासाठी लवकरच Twin Star Technologies कडून 500 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. तर उर्वरित पैसे हे नॉन-कंवर्टिबल डिबेंचर्सच्या स्वरुपात चुकते केले जाणार आहेत.
समभागधारकांना कोणताही लाभ मिळणार नाही
एनसीएलटीच्या आदेशानुसार व्हीडिओकान कंपनीचे समभाग डिलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 18 जूननंतर व्हीडिओकॉन इंडस्ट्रीजचे समभाग खरेदी-विक्रीसाठी शेअर बाजारात उपलब्ध नसतील. या समभागांची किंमत शून्य होईल.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही
मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार
6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार
(Shareholders of videocon will not get anything know the reason)