Adani Green ASM : गौतम अदानी यांचे शेअर तेजीत, या वृत्तामुळे भाव वधारले

Adani Green ASM : अदानी ग्रीनच्या शेअरने बीएसई आणि एनएसईवर जोरदार कामगिरी बजावली. दोन्ही निर्देशांकावर या शेअरने कमाल केली आहे. एका बातमीने हा परिणाम साधला आहे. काय आहे ही बातमी?

Adani Green ASM : गौतम अदानी यांचे शेअर तेजीत, या वृत्तामुळे भाव वधारले
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी पुन्हा आनंदवार्ता आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अदानी समूहाला मोठा फटका बसला आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने (Hindenburg Report) दिलेल्या दणक्यातून सावरायला या समूहाला मोठा कालावधी लागला. अजूनही या धक्क्यातून हा समूह बाहेर आला नाही. पण आता स्टॉक एक्सचेंजमधून या समूहासाठी चांगली वार्ता हाती आली आहे. कंपनीचे स्टॉक तेजीत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या स्टॉकने कमाल केली आहे. लाँग चर्म ॲडिशनल सर्व्हिलांस मेजर फ्रेमवर्क (ASM Framework) दुसऱ्या टप्प्यातून पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला आहे. त्याचा हा परिणाम आहे.

अदानी यांचे शेअर रडारवर गौतम अदानी यांचे शेअर अजूनही रडारवर आहेत. सेबीचे या समूहाच्या शेअरवर लक्ष आहे. या वृत्ताचे परिणाम गेल्या आठवड्यापासूनच दिसून येत आहे. 6 एप्रिल रोजीपासून हा बदल दिसून आली. अदानी समूहातील सर्व शेअरमध्ये रॅली दिसून येत आहे. केवळ अदानी ग्रीनच नाही तर या समूहाच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे विविध शेअर वेगवेगळ्या फ्रेमवर्कच्या देखरेखीखाली आहेत. यामध्ये Adani Total Gas, Adani Transmission, Adani Green, NDTV यांना दीर्घकालीन टर्म एएसएमवर ठेवण्यात आले आहे. तर Adani Power सध्या शॉर्ट टर्म एएसएमच्या पहिल्या टप्प्यात आहेत.

अदानी ग्रीनवर देखरेख Adani Green Energy च्या शेअरसाठी स्टॉक एक्सचेंजवर दिलासा जरुर आहे. परंतु त्यांच्यावर सेबीसह एनएसई आणि बीएसईचे पण लक्ष आहे. गुरुवारी या शेअरला सेंकड स्टेजमधून फर्स्ट स्टेजमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे अदानी यांच्या चार शेअरला अप्पर सर्किट लागे आहे. त्यात अदानी ग्रीन एनर्जीचा समावेश आहे. या शेअरमध्ये 5 टक्के उसळी दिसून आली. हा शेअर 856.35 रुपयांवर बंद झाला. याशिवाय अदानी ट्रान्समिशनच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. या शेअरमध्ये 5 टक्के तेजी दिसून आली. हा शेअर सध्या 953.20 टक्क्यांवर बंद झाला. तर अदानी टोटल गॅसला अप्पर सर्किट लागले. या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 863 रुपयाच्या स्तरावर आहेत. तर एनडीटीव्ही स्टॉक 5 टक्के वधारुन 194.40 रुपयांवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

या शेअरमध्ये तेजीचे सत्र

  1. स्टॉक मार्केटमध्ये गुरुवारच्या व्यापारी सत्रात अदानींचे इतर शेअर तेजीत होते
  2. Adani Wilmar Ltd चा स्टॉक 3.43 टक्क्यांनी वधारला. हा स्टॉक 410.55 रुपये
  3. Adani Ports and Special Economic Zone स्टॉक 0.77 टक्के तेजीसह 641.65 रुपये
  4. Adani Enterprises च्या शेअरमध्ये 3.22 टक्के वाढीसह 1,752.60 रुपयांवर
  5. Adani Power Ltd चे शेअर 1.03 टक्के तेजीसह 192.05 रुपयांवर
  6. ACC Ltd चा स्टॉकमध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन तो 1,712 रुपयांवर
  7. Ambuja Cements Ltd चा शेअरमध्ये 0.70 टक्के वाढून 382.60 रुपयांवर बंद झाला

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.