देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम

देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम हा कार उत्पादनावर होत असल्याचे, भारतामधील प्रमुख कार निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने म्हटले आहे. देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कार निर्मितीसाठी लागणार इतर कच्चा माला देखील महागल्याने येणाऱ्या काळात गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असा अंदाज कंपनीकडून वर्तवण्यात आला आहे.

देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 6:45 AM

 नवी दिल्ली :  देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम हा कार उत्पादनावर होत असल्याचे, भारतामधील प्रमुख कार निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने म्हटले आहे. देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कार निर्मितीसाठी लागणार इतर कच्चा माला देखील महागल्याने येणाऱ्या काळात गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असा अंदाज कंपनीकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान कोरोना काळात वाहनांच्या निर्मितीमध्ये घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा वाहन निर्मिती पूर्वपदावर येत असल्याची माहिती देखील कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

वाहनांची मागणी वाढली

बाजारात मारूतीच्या वाहनांना मोठी मागणी आहे, सध्या स्थितीमध्ये जवळपास 25 लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिगमध्ये आहे. मात्र सेमी कंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहन निर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्याप्रमाणात वाहनांची निर्मिती व्हायला हवी त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. परिणामी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याचे कंपनी म्हटले आहे.

दरवाढीचे संकेत

दरम्यान सेमीकंडक्टरसोबतच वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या इतर कच्च्यामालाची देखील  किंमत वाढली आहे. मोठ्याप्रमाणात कच्चा माल हा बाहेरून आयात करण्यात येतो. आतंरराष्ट्रीय बाजारात किमंत वाढल्याने वाहन निर्मितीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भविष्यात गाड्यांच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असे संकेत देखील कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. कोरोना काळात उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होत असून, लसीकरणाला देखील वेग आला आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट न आल्यास थोड्याच दिवसात कंपनीचे उत्पादन हे कोरोनापूर्व स्थितीमध्ये पोहोचू शकते असे कंपनीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

कॅनरा बँकेत मर्यादित कालावधीची ऑफर सुरू, 6.65% दराने गृहकर्ज, इतर बँकांचे दर काय?

1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का?

ATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.