Silver Investment : चांदी देईल गोल्डन रिटर्न! सोन्यापेक्षा चांदीचे नाणे खणखणीत, समजून घ्या फायद्याचे गणित

Silver Investment : सोन्यापेक्षा चांदी ही जबरदस्त खेळाडू ठरली आहे. चांदीने परताव्यात तर सोन्याला पण मात दिली. आता तर तज्ज्ञांच्या मते, चांदीच सोनं ठरणार आहे.

Silver Investment : चांदी देईल गोल्डन रिटर्न! सोन्यापेक्षा चांदीचे नाणे खणखणीत, समजून घ्या फायद्याचे गणित
चांदीची चमक
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 6:41 PM

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात चांदीच सोनं ठरणार आहे. सोन्यापेक्षा चांदी सर्वाधिक परतावा (Silver Return) देणार आहे. यापूर्वी चांदीने सोन्यापेक्षा गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा दिला आहे. आता पण चांदी अधिकचा परतावा देणार आहे. सोने आणि चांदीचे मूल्य ठरविणाऱ्या एका रेशाच्या अहवालानुसार, चांदी आउटरफॉर्म, चाकोरी सोडून जोरदार परतावा (Golden Return) देईल. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने गुंतवणूकदार, खरेदीदारांनी स्वस्त पर्यायाकडे मोर्चा वळविला आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी पण चांदीचा वापर वाढला आहे. त्यामुळेच सोन्यापेक्षा चांदीची चमक वाढली आहे. इकनॉमिक टाईम्समधील एका अहवालानुसार, चांदी चमत्कार घडविणार आहे.

चांदीची रॉकेट भरारी यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

गोल्ड-सिल्व्हर रेशो विश्लेषकांच्या मते, सोने-चांदीचा प्रमाण दर सध्या 80 इतका आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चांदीच्या किंमतीत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. काही ब्रोकर हाऊसने चांदी येत्या दिवसांत जोरदार कमाल करणार असल्याचे सांगितले. वायदे बाजारात सध्या चांदीची किंमत 85,000-86000 रुपयांच्या घरात पोहचू शकते.

हे सुद्धा वाचा

चांदीसाठी सर्वात मोठे मार्केट भारत चांदीचा सर्वात मोठं मार्केट आहे. भारत हा चांदीचा मोठा आयातदार आहे. भारत त्याच्या गरजेचा 90 टक्के हिस्सा आयात करतो. 2022 मध्ये जवळपास 9500 टन चांदी आयात करण्यात आली होती. सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळेच चांदीच्या किंमतीत आणखी मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

चांदीची सोन्यावर कुरघोडी मार्च महिन्यात चांदीने गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि चीनमधील परिस्थिती सुधारत असल्याने चांदीची (Silver Return) मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अचंबित झाले आहे. आतापर्यंत सोनेच सर्वाधिक कमाई करुन देणारी सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येत होती. पण चांदीने सोन्यावर कुरघोडी केली आहे.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.