AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China : चीनच्या आर्थिक विकासातील मंदीमुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राची चांदी; गुंतवणूक वाढीची शक्यता

मूडीजने चीनच्या 2022 च्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ताज्या अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 3.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे.

China : चीनच्या आर्थिक विकासातील मंदीमुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राची चांदी; गुंतवणूक वाढीची शक्यता
| Updated on: Aug 20, 2022 | 11:47 AM
Share

नवी दिल्ली : देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे चीनमधील (China slowdown) आर्थिक विकासातील मंदी ही भारताच्या उत्पादन (Indian Manufacturing) क्षेत्रासाठी एक संधी आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे. ही चिन्हे लक्षात घेता, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि पर्यायी जागतिक पुरवठा केंद्र म्हणून उदय होण्यासाठी भारताला आपले उत्पादन क्षेत्र मजबूत करणे, आवश्यक आहे असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate Sector) सुरू असलेल्या समस्या आणि कोव्हिडची साथ रोखण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चीनचा आर्थिक विकास दर यंदा 3.5 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय तैवानवरून अमेरीका आणि चीनमध्ये वाढता तणाव पाहता आतंरराष्ट्रीय राजकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तैवानचा मुद्दा येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता आणेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील कच्चा माल आणि उपकरणांच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

काय आहे तज्ज्ञाचं मत ?

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुजान हाजरा म्हणाले की, चीनमधील मंदीच्या चिन्हांमुळे भारतासाठी काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील. पहिली गोष्ट म्हणजे, चीनमधील अनिश्चिततेमुळे, पर्यायी जागतिक पुरवठा केंद्र म्हणून भारत हा आकर्षक पर्याय ठरू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे, जागतिक गुंतवणूकदारांच्या उदयोन्मुख बाजारपेठांना जो निधी वितरीत करण्यात येतो, त्यामध्ये भारताचा वाटा वाढू शकतो, असे हाजरा यांनी सांगितले. तर इनक्रेज पीएमएसचे पोर्टफोलिओ मॅनेजर आदित्य सूद यांच्या मतानुसार, चीनमधील मंदीमुळे भारताला जागतिक मूल्य साखळीतील आपला वाटा वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) योजनेसह विविध पाऊले उचलल्यास वस्तूंच्या निर्यातीला आणखी चालना मिळण्यास महत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोनाचा फटका

जागतिक रेटिंग एजन्सी असणाऱ्या ‘मूडीज’ने 2022 सालातील चीनच्या आर्थिक विकास दर कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ताज्या अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास दर 3.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. यापूर्वी अर्थव्यवस्थेची वाढ 4.5 टक्के दराने होणं अपेक्षित होतं. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू असलेल्या समस्या आणि कोव्हिडची साथ रोखण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आलेले लॉकडाऊन या गोष्टी विकास मंदावण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. देशातील रिअल इस्टेट सेक्टरमधील कंपन्यांवर कर्जाचे खूप ओझे आहे. ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो. तर दुसरीकडे चीनमधील सरकार झिरो कोव्हिड पॉलिसीवर काम करत असून त्यामुळेही आर्थिक विकास मंदावला आहे. त्याचबरोबर चीन सध्या भीषण वीज संकटाशीही लढा देत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.