स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय, ‘या’ 5 बेस्ट ऑप्शनचा विचार करा, पहिल्या दिवसापासून कमाई

फळांचा ज्यूस, टेलरिंग, बेकरी शॉप, मेस, प्लंबर आणि इलेक्ट्रिशीयन यासारखे छोटे व्यवसाय सहजपणे करता येऊ शकतात. (Small Business)

स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय, 'या' 5 बेस्ट ऑप्शनचा विचार करा, पहिल्या दिवसापासून कमाई
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 10:57 AM

सातत्यानं वाढत असलेल्या महागाईमुळे अनेक जण अधिक पैसे कमावण्याचा विचार करत असतात. बदलत्या जीवनशैलीमध्ये एका नोकरीच्या पगारावर लोकांचा घरखर्च भागत नाही. यामुळे लोक स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतात. काही जण व्यवसाय सुरु करुन कामाला लागतात. मात्र, काही जणांना कोणता व्यवसाय सुरु करायचा हे ठरवणं अडचणीचे जाते. फळांचा ज्यूस, टेलरिंग, बेकरी शॉप, मेस, प्लंबर आणि इलेक्ट्रिशीयन यासारखे छोटे व्यवसाय सहजपणे करता येऊ शकतात. (Small business with small investment )

ज्यूस शॉप

कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीमुळं नागरिक आरोग्याविषयी जागरुक झाले आहेत. नोकरी करणारे लोक जीमचा पर्याय देखील निवडतात. ऑफिसला जाणारे लोक आणि काही कामांसाठी बाहेर पडणारे नागरिक विविध प्रकराचे ज्यूस पिणे आरोग्यदायी मानतात. आरोग्याबाबत जागरुक असणारे लोक स्वत:हून ज्यूसचे दुकान शोधत असतात. ज्यूस शॉप सुरु करण्यासाठी येणारा खर्च कमी असतो. ज्यूस शॉप सुरु करुन आपण थेट घरपोच सेवा दिली तर चांगले पैसे कमवू शकता.

टेलरिंग

महिला आणि मुली नवीन फॅशन आणि डिझाईनच्या कपड्यांना पसंती देत असतात. लग्न किंवा इतर कार्यक्रमांना अनेकांना हटके करण्याची इच्छा असते. हे लक्षात घेऊन आपल्याला टेलरिंगचा व्यवसाय देखील करता येऊ शकतो. आपल्याला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी टेलर्सची टीम गरजेची असेल, त्याद्वारे तुम्ही फायदा मिळवू शकता. ओएलएक्स, क्विकर आणि इतर शॉपिंग वेबासाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता.

बेकरी शॉप

बदलत्या जीवनशैलीनुसार नागरिकांच्या सवयी बदलेल्या आहेत. घरी पदार्थ बनवून खाण्याऐवजी बेकरीमधील पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अलीकडील काळात बेकरीतील पदार्थांची मागणी वाढली आहे. तुम्हाला बेकरी व्यवसाय करायचा असेल तर स्वत: बेकरी सुरु करु शकता किंवा एखाद्या नामांकित बेकरीची फ्रेंचायजी घेऊ शकता.

टिफीन सर्व्हिस

नोकरी आणि कामाच्या निमित्तानं अनेकांना शहरात येऊन राहावे लागते. त्यामुळे कमी किमंतीत घरगुती स्वरुपाचे जेवण मिळावे, अशी अनेकांची मानसिकता असते. याचा विचार करुन तुम्ही मेस सुरु करु शकता. मेस सुरु करुन चांगले पैसे कमवता येऊ शकतात. हा व्यवसाय सुरु केल्यानंतर माऊथ-पब्लिसिटी होणं गरजेचे आहे.

प्लंबर, इलेक्ट्रिशीयन सेवा

प्लंबर आणि इलेक्ट्रिशीयन यासारख्या सेवांची गाव किंवा शहर कुठेही सतत गरज पडत असते. पाणी आणि वीज नसेल तर लोक हवालदिल होत असतात. यामुळे प्लंबर आणि इलेक्ट्रिशीयन यांची टीम बनवून व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. तुमच्याकडे कौशल्य असेल तर हा व्यवसाय सुरु करु शकता आणि ग्राहकांना चांगली सेवा देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करु शकता. या सेवेसाठी काही अ‌ॅप्सचीदेखील मदत घेतली जाऊ शकते.

संबंधित बातम्या:

IAS ते Scientist; ‘या’ आहेत गलेलठ्ठ पगार देणाऱ्या देशातील टॉप 5 सरकारी नोकऱ्या

आता क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त करा ‘हे’ काम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.