Share : गुंतवणूकदारांची लॉटरी! 1 वर 9 शेअरचा बोनस, आणि कामगिरी म्हणाल तर एकदम दणक्यातच..
Share : या शेअरने गुंतवणूकदारांना एकदम छप्परफाड कमाई करुन दिली आहे..
नवी दिल्ली : स्मॉल कॅप कंपनी(Small Cap Company) एलस्टोन टेक्सटाईल्सच्या (Alstone Textiles Shares) गुंतवणूकदारांना जॅकपॉट मिळाला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर 5 टक्के वृद्धीसह 300.45 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअरने (Share) महिनाभरापासून 164 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे.
या कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 9 शेअरचा बोनस दिला आहे. एवढंच गुंतवणूकदारांच्या पदरात पडणार नाही तर कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची (Stock Spilt) घोषणा केली आहे. म्हणजे 1 शेअरवर गुंतवणूकदारांना 10 शेअरची भेट मिळणार आहे.
या सर्व घोषणा कंपनीने केल्या आहेत. हे सर्व लाभ देण्यासाठी कंपनीने तारीखही निश्चित केली आहे. त्यानुसार, 14 डिसेंबर 2022 रोजी कंपनी गुंतवणूकदारांना घोषणेप्रमाणे लाभ देणार आहे.
गेल्या अनेक व्यापारी सत्रात या कंपनीचा शेअर सातत्याने उच्चांकी पातळीवर आहे. हा शेअर अप्पर सर्किट लावत आहे. वार्षिक आधारावर या शेअरने गुंतवणूकदारांना 1,807.62 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे.
या शेअरने बाजारात जबरदस्त कामगिरी बजावली आहे. हा शेअर 15.75 रुपयांहून थेट 300.45 रुपयांवर पोहचला आहे. त्याचा हा चढता आलेख विश्लेषकांना आंचबित करणार आहे.
या स्मॉल कॅप कंपनीने शेअर बाजाराला गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनाची माहिती दिली आहे. एक रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ही कंपनी एक रुपयांचे मूल्य असलेले 9 शेअर देणार आहे. हा बोनस गुंतवणूकदारांना मालामाल करणारा असेल .
या कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत 8 कोटींची उलाढाल केली आहे. ही कंपनी परदेशात आणि देशातंर्गत कपड्याची विक्री करते. त्याचा येत्या काही दिवसात फायदा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.