‘या’ फंडांनी 5 वर्षांत दिला 50 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या
गेल्या 5 वर्षात स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आम्ही येथे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आणि बेंचमार्कबद्दल सांगत आहोत. त्याचबरोबर सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंडांची यादीही पुढे देण्यात आली आहे. याविषयी पुढे जाणून घ्या.

तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्त रिस्क घेऊन जास्त परतावा हवा असेल तर स्मॉल कॅप फंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) अधिकृत वेबसाइटनुसार, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या 5 वर्षांत 51.90 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की, या श्रेणीतील फंडांवर बाजारातील चढउतारांचा जास्त प्रभाव पडतो. ज्या गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीत जास्त जोखीम घेऊन दीर्घ काळ गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हे फंड सर्वोत्तम मानले जातात. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी आपली आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत.
स्मॉल कॅप फंड म्हणजे काय?
स्मॉल कॅप फंड हे म्युच्युअल फंड आहेत जे छोट्या आणि उदयोन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यांचे मार्केट कॅप (कंपनीचे एकूण बाजारमूल्य) कमी असते. या कंपन्या वेगाने वाढू शकतात, परंतु त्यांना उच्च जोखीम देखील आहे.
गेल्या 5 वर्षात सर्वाधिक परतावा देणारे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड
1) क्वांट स्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 51.90 टक्के
बेंचमार्क रिटर्न: 37.46%
2) निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
पंचवार्षिक परतावा: 41.93 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
3) बँक ऑफ इंडियास्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 38.75 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
4) टाटा स्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 38.49 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
5) एचएसबीसी स्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 38.28 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
6) बंधन स्मॉलकॅप फंड
पंचवार्षिक परतावा : 38.20 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 36.67%
7) एडलवाइज स्मॉल कॅप फंड
पंचवार्षिक परतावा: 38.02%
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
8) कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड
पंचवार्षिक परतावा: 38.00%
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
9) एचडीएफसी स्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 37.43 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 36.67%
10) कोटक स्मॉल कॅप फंड
पाच वर्षांचा परतावा: 36.93 टक्के
बेंचमार्क रिटर्न : 37.46%
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)