Golden Plan : मोदी सरकारचा गोल्डन पंच! महागाईवर सर्जीकल स्ट्राईक, सोन्यात येणार स्वस्ताई

Golden Plan : देशात सोने एकदम स्वस्त होणार आहे. पेट्रोल-डिझेल पॅटर्न प्रमाणेच मोदी सरकारने आता सोन्यासाठी ही खासमखास योजना आखली आहे, काय देशात सोने एकदम स्वस्त होणार?

Golden Plan : मोदी सरकारचा गोल्डन पंच! महागाईवर सर्जीकल स्ट्राईक, सोन्यात येणार स्वस्ताई
सोन्याची स्वस्ताई
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 4:48 PM

नवी दिल्ली : भारतात सोन्याच्या महागाईने (Gold Inflation) गुंतवणूकदार सोडाच ग्राहकही हैराण झाले आहेत. अवघ्या काही वर्षातच सोने दुप्पटीवर पोहचले. सोन्याचे बदल रुप अनेकांना सुरुवातीला भावले, पण आता अनेकांनी सोन्यापासून अंतर राखले आहे. अक्षय तृतीयाला देशातील सोने खरेदीच्या आकड्यांनी सराफा बाजार हिरमुसला आहे. दरवाढीचा (Gold Price) खरेदीवर मोठा परिणाम दिसून आला. पण आता देशात सोन्याची स्वस्ताई येण्याची शक्यता आहे. देशात सोने एकदम स्वस्त होणार आहे. पेट्रोल-डिझेल पॅटर्न प्रमाणेच मोदी सरकारने आता सोन्यासाठी ही खासमखास योजना आखली आहे, काय आहे ही योजना, त्यामुळे खरंच देशात सोने एकदम स्वस्त होणार?

काय आहे योजना भारत संयुक्त अरब अमिरातचे संबंध अत्यंत सौहार्द पूर्ण तर आहेच. पण कच्चा तेलाचे किंमत अदा करताना भारतीय तेल विपणन कंपन्या त्या युएईच्या दिरहममध्येच करतात. आता भारताने युएईच्या माध्यमातून आणखी प्लॅन आखला आहे. युएईकडून भारत (India-UAE Gold Trade) लवकरच 14 कोटी टन सोने अत्यंत माफत शुल्क देऊन आयात करणार आहे. द्विपक्षीय व्यापार करारातंर्गत ही आयात करण्यात येणार आहे. सध्या भारत सोने आयात करण्यासाठी एक नवीन विंडो उघडेल, ज्याला व्यापारिक भाषेत टॅरिफ रेट कोटा (TRQ) म्हणतात आणि या अंतर्गत आयातीला परवानगी देण्यात येईल.

सोने विक्री परदेश व्यापार महानिदेशक संतोष सारंगी यांनी गुरुवारी याविषयी माहिती दिली. त्यानुसार, भारत-युएई व्यापक आर्थिक धोरण करार करण्यात येत आहे. त्यातंर्गत भारतीय आयातदारांसाठी एक नियमावली तयार करण्यात येत आहे. या धोरणातंर्गत नवीन आणि जुन्या आयातदारांसाठी सोने टीआरक्यू देण्यात येईल. डीजीएफटी नुसार, सध्याची प्रणाली आणि प्रक्रिया आयातदारांच्या समूहासाठी फिजिकल सोने देण्यासाठी सक्षम नाही.

हे सुद्धा वाचा

सरकारचा महसूल बुडणार नाही आयातदारांनी सोने आयात केल्यावर नवीन विंडोचा उपयोग करुन दागिने तयार करणारे आणि ज्वैलर्सला खरेदी करण्यास परवानगी देण्यात येईल. या सर्व प्रणालीत, प्रक्रियेत सरकारचा महसूल बुडणार नसल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली.

केवळ 1 टक्के सवलतीवर आयात सीईपीएनुसार, भारत 2023-24 मध्ये संयुक्त अरब अमिरातकडून 14 कोटी टन सोने अत्यंत माफत शुल्क देऊन आयात करणार आहे. प्रभावी सीमाशुल्क किंवा मोस्ट फेव्हर्ड नेशन दराच्या अनुषंगाने केवळ 1 टक्के सवलतीवर आयात होईल. सध्या त्यासाठी 15 टक्के शुल्क आकारण्यात येत आहे.

गेल्यावर्षी 110 मेट्रिक टन सोने आयात गेल्यावर्षी सवलतीच्या दरात 110 मेट्रिक टन सोने आयात करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी 81 लाख टन सोन्याची आयात करण्यात आली होती. ईटी नुसार, युएईने यापूर्वी केवळ सोन्यापासून दागिने तयार करणाऱ्यांना आणि काही ज्वेलर्स साठी टीआरक्यू धोरणानुसार सोने आयातीच्या बाजूने होता. पण केंद्र सरकार आता त्यासाठी नवीन विंडो सिस्टिम तयार करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आयात -निर्यात करण्याचा कोड आहे, त्यांना विहित पद्धतीने या योजनेत सहभागी होता येईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.