Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Life Certificate: एसबीआयची खास सुविधा! आता पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे हयातीचा दाखला सादर करता येणार, जाणून घ्या

SBI ने सांगितले की, व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना अधिकृत वेबसाईट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊनमधून 'व्हिडीओ एलसी' निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक प्रविष्ट करा.

SBI Life Certificate:  एसबीआयची खास सुविधा! आता पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे हयातीचा दाखला सादर करता येणार, जाणून घ्या
oldage
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:21 AM

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करत आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडीओ कॉलद्वारे त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात. SBI ने या नवीन सुविधेला व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सर्विस असे नाव दिले आहे.

? ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा

SBI ने सांगितले की, व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना अधिकृत वेबसाईट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊनमधून ‘व्हिडीओ एलसी’ निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर नियम आणि अटी स्वीकारा आणि ‘स्टार्ट जर्नी’ वर क्लिक करा.

? पॅन कार्ड तयार ठेवा

? व्हिडीओ कॉलदरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, ‘I am Ready’ वर क्लिक करा. ? व्हिडीओ कॉल सुरू करण्यासाठी कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्थानाशी संबंधित परवानग्या द्या. ? SBI अधिकारी व्हिडीओ कॉलवर येईल. ? तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेवर व्हिडिओ कॉल शेड्यूल करू शकता. ? व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर, पेन्शनधारकाला पडताळणी कोड मिळेल. हे SBI अधिकाऱ्याला सांगा. ?व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआयचे अधिकारी ते ताब्यात घेतील. ? एसबीआय अधिकारी पेन्शनधारकाचा फोटोही काढतील. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

? पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईट

एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास वेबसाईटही तयार केली. पेन्शनधारकाला या वेबसाईटवर प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉगिन करून वापरता येते. या वेबसाईटमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित अनेक कामे सुलभ होणार आहेत. वेबसाईटद्वारे वापरकर्ते थकबाकी गणना पत्रक डाऊनलोड करू शकतात. यासह तुम्ही पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-16 देखील डाऊनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणूक माहिती आणि जीवन प्रमाणपत्र स्थिती देखील तपासली जाऊ शकते. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

गाई-म्हशी खरेदीसाठी सरकार देतेय 45000 अनुदान, पोल्ट्री फार्मसाठी पैसे घ्या अन् असा करा अर्ज

IDFC फर्स्ट बँकेसह तीन बँकांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, वाचा तपशील

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.