शनिवार विशेष : 2020 मध्ये सोन्याच्या किंमती चमकल्या, यंदाही असाच राहणार ट्रेंड?

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2021 मध्ये 10 ग्रॅम सोनं तब्बल 63,000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. Gold Silver Price Trend

शनिवार विशेष : 2020 मध्ये सोन्याच्या किंमती चमकल्या, यंदाही असाच राहणार ट्रेंड?
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 1:24 PM

Gold Price in 2021: कोरोनाच्या जीवघेण्या काळात जसा आर्थिक फटका बसला तशा अनेक आर्थिक उलाढालीही झाल्याचं पाहायला मिळालं. अशात सोन्याच्या दरांत मागच्या वर्षी वारंवार चढ-उतार होताना दिसला. तसं पाहिला गेलं तर 2020 मध्ये अर्थव्यवस्था ढासळली असली तरी सोन्याचे भाव जोरदार वाढले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीही सोनं चांगलंच चमकणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Special Report Gold Silver Price Trend in 2021)

सध्या सोनं प्रति 10 ग्रॅमच्या आसपास सुमारे 50 हजार रुपयांवर बाजारात खेळलं. पण नव्या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये यात चांगली तेजी पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2021 मध्ये 10 ग्रॅम सोनं तब्बल 63,000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे.

मागच्या वर्षाच्या (Gold Price in 2020) सुरुवातीला देशांतर्गत सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 39100 रुपये इतका होता. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा सोन्याचा दर 1517 डॉलर प्रति औंस इतका होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोने-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ झाली. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम 56 हजार 191 रुपये इतका झाला होता. म्हणजेच वर्षभरात सोन्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली. दरम्यान सध्याच्या किंमतीनुसार त्यात 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे. मात्र, जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

मागच्या वर्षी दिवाळीत सोन्यात दोन हजार कोटींची उलाढाल

गेल्या वर्षी जगभर कोरोनाचं भीषण संकट असलं तरी दिवाळी मोठ्या दणक्यात साजरी झाली. कारण, दिवळीमध्ये फक्त महाराष्ट्रातच तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल झाली होती. दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या खास दिवशी सोने-चांदीला मोठी मागणी असल्याचं दिसून आलं. यामुळे राज्यात दोन हजार कोटींची तर फक्त जळगावात 70 कोटींची उलाढाल झाली.

2020 मध्ये 28 टक्के सोनं महागलं

गेल्या भारतात सोन्याचा दर 28 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेमध्ये 2020 ला सोन्याची चमक (Gold Rate in 2020) 23 टक्क्यांनी वाढली. खरंतर, कोरोनाच्या महामारीमुळे (Corona Virus Pandemic) अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि वाढत्या महागाईचा (Inflation) सामना करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली असं बोललं जातं होतं. यात गुंतवणूकदारांचाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या किंमती चकाकण्यात 2020 हे सलग दुसरे वर्ष आहे. याआधीही 2019 मध्ये सोन्याच्या भावात दुपटीने वाढ झाली होती.

मार्चनंतर सोन्याच्या किंमती सातत्याने वाढल्या

गेल्या वर्षी सुरुवातीच्या दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत सामान्य पातळीवर होत्या. पण, जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्चनंतर सोन्याचे दर गगनाला भिडले. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. त्यामुळे हे वर्ष आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी कसं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

संबंधित बातम्या :

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भाव घसरला!

(Special Report Gold Silver Price Trend in 2021)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.