PNB कडून 1 डिसेंबरपासून खास नियम लागू, तुमच्या पैशांवर काय परिणाम?
मुदत ठेवींच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही. पंजाब नॅशनल बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 2.9% ते 5.25% दरम्यान व्याजदर देते. PNB 7-45 दिवसांच्या FD वर 2.9% व्याजदर देते. जर तीच FD 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी घेतली असेल तर 4.4% व्याज मिळेल. PNB एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.10% व्याज देते.
नवी दिल्लीः मोदी सरकारनं 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदललेत. हे नियम विशेषतः आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत. पंजाब नॅशनल बँक (PNB) चेदेखील यात नाव आहे. या बँकेने बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरात कपात केलीय. त्यामुळे याचा तुमच्या पैशावर परिणाम होणार आहे. तुमचे पैसे PNB च्या बचत खात्यात जमा केले तर त्यावर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. PNB ने बचत खात्यावरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केलीय.
10 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 10 बेसिस पॉइंट्सची कपात
PNB चा हा नियम 1 डिसेंबर 2021 पासून लागू झालाय. ज्यांच्या ठेवी 10 लाखांपेक्षा जास्त आहेत, अशा ग्राहकांना PNB ने थोडा वेळ दिलाय. 10 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 10 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आलीय. त्याचप्रमाणे बचत खात्यात 10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवल्यास व्याजदरात 5 आधार अंकांची कपात करण्यात आलीय. या दोन्ही खात्यांवर आता अनुक्रमे 2.80 टक्के आणि 2.85 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
किती रुपयांच्या ठेवीवर किती व्याज?
PNB च्या बचत खात्यात 10 लाखांपेक्षा कमी ठेव असल्यास ग्राहकांना 2.80 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक ठेव असल्यास त्यावर 2.85 टक्के दराने व्याज दिले जाईल. हा नवा नियम 1 डिसेंबर 2021 पासून लागू झालाय. PNB नुसार, हा नवा नियम घरगुती आणि NRI दोन्ही खात्यांना सारखाच लागू आहे.
FD मध्ये फरक नाही
मुदत ठेवींच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही. पंजाब नॅशनल बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 2.9% ते 5.25% दरम्यान व्याजदर देते. PNB 7-45 दिवसांच्या FD वर 2.9% व्याजदर देते. जर तीच FD 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी घेतली असेल तर 4.4% व्याज मिळेल. PNB एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.10% व्याज देते. 2 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या आणि 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD ठेवींवर 5.10% व्याज उपलब्ध आहे. PNB 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.25% व्याज देते. हे दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत.
SBI चा नवा नियम
दुसरी बातमी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. 1 डिसेंबरपासून स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना 99 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ईएमआय व्यवहारांसाठी भरावे लागेल. जे ग्राहक ईएमआयवर खरेदी करतात, मग ते व्यापारी आउटलेटवर असोत, ई-कॉमर्स वेबसाइटवर असोत किंवा एसबीआयच्या अॅपद्वारे असोत, त्यांना प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मेल पाठवला
यासंदर्भात SBI च्या क्रेडिट कार्ड कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मेल पाठवला आहे. 1 डिसेंबर 2021 पासून सर्व व्यापारी EMI व्यवहारांवर प्रक्रिया शुल्कासह 99 रुपये अधिक कर भरावा लागेल. व्यापारी आउटलेट्स, वेबसाइट्स किंवा अॅप्सवर केलेल्या सर्व खरेदीवर प्रक्रिया शुल्क आकारले जाईल, जे EMI मध्ये केले जातात. त्यासोबतच करही भरावा लागणार आहे.
संबंधित बातम्या
सोन्याचे दागिने विकणे ज्वेलर्सना पडणार भारी, मोदी सरकारचा कायदा देशातील 256 शहरांत लागू
Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा नवे दर