Namo Bharat Train | ‘नमो भारत’चा श्रीगणेशा, काय आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचे कनेक्शन
Namo Bharat Train | भारताला त्याची पहिली सेमी-हायस्पीड रिझनल रेल्वे सर्व्हिस, 'नमो भारत' मिळाली आहे. यामुळे दिल्ली आणि मेरठ या दोन शहरातील अंतर 40 टक्क्यांनी कमी झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरातील भाड्यांशी या रेल्वेचे काय खास कनेक्शन आहे ते? भारतातील या श्रीमंत महिलेच्या नावाचा पण का होत आहे चर्चा
नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : दिल्ली-गाझियाबाद-मेरठ या शहरांदरम्यान नवा अध्याय सुरु होणार आहे. भारतातील पहिली सेमी हायस्पीड रिझनल रेल्वे सर्व्हिस नमो भारतचा श्रीगणेशा झाला आहे. सध्या नमो भारत साहिबाबाद ते दुहाई डेपो दरम्यान धावत आहे. पण यामुळे भारतातील सार्वजनिक वाहतूक सुविधा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होत आहे. पण या रेल्वेचे आपल्या घरातील भाड्यांशी काय खास कनेक्शन आहे? भारतातील या श्रीमंत महिलेच्या नावाची पण या रेल्वेमुळे का होत आहे चर्चा?
रेल्वे क्षेत्रात क्रांती
दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वेचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचा हातभार लावत आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या रेल्वे क्षेत्रात क्रांती येणार आहे. काय आहे हा प्रकल्प, तिच्या बांधणीत कशाचा झाला आहे वापर?
स्टेनलेस स्टीलची रॅपिड रेल्वे
‘नमो भारत’ रॅपिड रेल्वे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची तयार झाली आहे. ही रेल्वे तयार करण्यासाठी 600 टन स्टेनलेस स्टील लागले आहे. आपल्या घरातील स्टीलच्या भांड्याशी त्याचे कनेक्शन आहे. अर्थात स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा ग्रेड आणि या रेल्वेसाठीचे स्टील यात फरक आहे. नमो भारत तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचे 301 LN स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 2J आणि 2B यांचा वापर झाला आहे.
स्टेनलेस स्टीलचा वापर
‘नमो भारत’ ट्रेनमध्ये 6 कोच आहे. एलस्टॉमने एकूण 11 ट्रेन तयार केल्या आहेत. या 66 कोचमध्ये डब्याचा बाहेरील भाग, रेल्वेतील ब्रॅकेट्स, वॉल, सोल बार, वरचे छत, सर्वच स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आले आहे. ही रेल्वे स्टेनलेस स्टीलने तयार झालेली असली तरी ती वजनाने एकदम हलकी आहे. हलक्या वजनामुळेच ती ताशी 160 किमी वेगाने धावते. या रेल्वेमुळे ऊर्जेची मोठी बचत होते.
देशातील सर्वात श्रीमंत महिलेशी कनेक्शन
या ट्रेन तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पुरवठा JSW Steel कंपनीने केला आहे. या कंपनीच्या संचालक सावित्री जिंदल आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे. जिंदल स्टेनलेस स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक अभ्युदय जिंदलच्या आधारे फायनेन्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे, त्यानुसार भारत सरकारसोबत कंपनीने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. नमो भारत योजनेत सहभागी झाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.