Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा

महाविकास आघाडी सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत जाहीर केली आहे. Stamp Duty One Percent Discount

Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 2:00 PM

मुंबई : मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट जाहीर करत अर्थमंत्री अजित पवार यांनी गृह खरेदीदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. (Stamp Duty One Percent Discount) आतापर्यंत घर खरेदी करताना सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती, मात्र पुढील दोन वर्षांसाठी ती पाच टक्के असेल.

महाविकास आघाडी सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत जाहीर केली आहे. ही सवलत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (MMRDA), पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या विभागातील ग्राहकांसाठी असेल. दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क आणि इतर निगडीत भारामध्ये ही सवलत देण्यात आली आहे.

अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला.

मंदीमुळे घर खरेदीदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. बांधकाम क्षेत्रातील उलाढालीवरही गेल्या काही महिन्यात परिणाम झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कावर एक टक्का सूट दिली आहे. मुद्रांक शुल्कातील कपातीमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

गृहकर्जाचे व्याजदर वधारत आहेत, तर मागणी मात्र कमी झाली आहे. त्यामुळे गृहप्रकल्प विकासकही अडचणीत सापडले आहेत. मुद्रांक शुल्क कपातीने स्थावर मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि बांधकाम व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी चिन्हं आहेत.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. इंधनावर उपकर आकारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. पुढील दोन वर्षांसाठी हा उपकर आकारला जाईल. ही रक्कम पर्यावरणीय समस्यांसाठी काम करणाऱ्या ग्रीन फंडाकडे पाठवली जाईल. पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग झाल्यामुळे वाहनचालक काहीसे खट्टू झाले आहेत.

बजेटमध्ये महत्त्वाचं काय?

सामाजिक न्याय

  • सामाजिक न्याय विभागासाठी 9 हजार 668 कोटी,
  • पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह,
  • आदिवासी विकास विभागाला 8 हजार 853 कोटी,
  • ऊसतोड कामगारांच्या मुलांना वसतिगृहे,
  • तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी 5 कोटी
  • GST
    • मुंबईत वस्तू आणि सेवा केंद्र उभारणार, वस्तू आणि सेवा केंद्रासाठी 148 कोटी रुपये

    आमदार विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटींवर, पाच वर्षात विकास निधी 15 कोटींवर नेणार, अजित पवारांच्या घोषणेचं आमदारांकडून बाक वाजवून जोरदार स्वागत

  • दिवंगत नेत्यांची स्मारकं 

    दिवंगत नेत्यांच्या स्मारकाची घोषणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील यांची स्मृतिस्थळं बांधणार

  • शिवभोजन 
    • दररोज एक लाख शिवभोजन थाळ्या,
    • शिवभोजन थाळीसाठी 150 कोटींची तरतूद : अजित पवार
  • मुद्रांक शुल्क-पुढील दोन वर्षांत मुंबई पुण्यात मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याची घोषणा, बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्याचा प्रयत्न
  • सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून 50 कोटींची तरतूद

संबंधित बातम्या :

Budget 2020 : वाहनचालकांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग

2 लाखांवर कर्ज असणाऱ्यांनाही दिलासा देणार, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी : अजित पवार

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन

Stamp Duty One Percent Discount

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.