कर्ज बुडवलं? मग खा चॉकलेटचा लाडू! या बँकेची अनोखी गांधीगिरी

Bank Defaulter | कर्ज बुडव्यांना वठणीवर आणण्यासाठी या सरकारी बँका गांधीगिरी करणार आहे. अनेक जण कर्ज घेतात. काही हप्ते फेडतात आणि नंतर कर्जाचे हप्ते काही जमा करत नाही. अशा कर्ज बुडव्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांनी कर्ज लवकरात लवकर भरण्यासाठी या बँकांनी लाडू, चॉकलेटची भेट देण्याचा निर्णय घेतला होता.

कर्ज बुडवलं? मग खा चॉकलेटचा लाडू! या बँकेची अनोखी गांधीगिरी
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 5:40 PM

नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्याआधारे त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचा प्रयत्न असतो. काही जण प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात. काही जण अडचण आली तर बँकेत जाऊन तशी माहिती देतात. परिस्थिती सुधारल्यावर हप्ते फेड करतात. पण काही जण कर्ज बुडवतात. त्याची परतफेड करत नाही. अशा कर्ज बुडव्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी बँकांनी नवीन शक्कल लढवली आहे. या कर्जदारांचे हृदय परिवर्तन करण्यासाठी त्यांनी गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी या योजनेलाच सीलबंद केले.

बँकांनी काढले परिपत्रक

कर्जबुडव्यांना धडा शिकविण्याचा पक्का इरादा बँकांनी केला होता. त्यासाठी परिपत्रक पण काढले. पण हे परिपत्रक बँकांनी मागे घेतले. कोलकत्ता येथील युको बँकेने यासाठी पाऊल टाकले. 1 नोव्हेंबर रोजी त्यांनी परिपत्रक काढले. प्रत्येक शाखेतील 10 मुख्य कर्ज थकबाकीदारांची यादी शोधली. त्यांना दिवाळीत घरपोच लाडू, मिठाईचा डब्बा पोहचवण्याचे ठरले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल, असा त्यांचा अंदाज होता. पण ही योजना बारगळली.

हे सुद्धा वाचा

थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी युक्ती

  • थकबाकीदारांकडून थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बँका विविध युक्त्या शोधतात. काही मार्ग कायदेशीर तर काही मन परिवर्तन करण्याचे असतात. त्यात सुरुवातीला फोनद्वारे त्या व्यक्तीला कर्ज परत करण्याची सातत्याने आठवण करुन देण्यात येते. SBI ने कर्ज बुडव्यांना चॉकलेट पोहचतं करण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांना निदान जनाची नाही तर मनाची काही तरी लाज वाटून कर्ज फेड करण्याची सद्बुद्धी मिळण्याची अपेक्षा करण्यात येते.
  • याच धरतीवर युको बँकेने थकबाकीदारांना दिवाळीच्या काळात मिठाई देण्याचा योजना आखली होती. मुख्य थकबाकीदारांना गोड पदार्थ पाठवून कर्जाची आठवण करुन देण्यात येणार होती. त्यासाठी टॉप 10 डिफॉल्टर्सला भेटून त्यांना मिठाई देण्यात येणार होती. पण हा निर्णय अंमलात येण्यापूर्वीच बारगळला.

  • युको बँकेनुसार, थकबाकीदारांना वारंवार आठवण करुन दिली तरी ते कर्जाची परतफेड करत नाहीत. अधिकाऱ्यांना कर्ज वसूल करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. हे मोठे आव्हानचं असते. प्रत्येकाची काही अडचण असते. त्यामुळे काही जणांना हप्ता जमा करता येत नाही. जून तिमाहीत बँकेचा जीएनपीए कमी होऊन 4.48 टक्क्यांपर्यंत खाली आला. तर बँकेचा एनपीए 1.18 टक्के राहिला आहे.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.