Stock Market : शेअर बाजाराला पुन्हा हादरे, निर्देशांकाची जवळपास 900 अंकांची घसरगुंडी, निफ्टीची ही निसरडी पायवाट

Stock Market : शेअर बाजार निसरड्या पायवाटेने गेल्याने घसरला..

Stock Market : शेअर बाजाराला पुन्हा हादरे, निर्देशांकाची जवळपास 900 अंकांची घसरगुंडी, निफ्टीची ही निसरडी पायवाट
बाजाराची घसरगुंडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 8:14 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारावर (Share Market) नकारात्मक गोष्टींचा मोठा परिणाम झाला. बाजाराने आज आपटी बॉम्ब फोडल्याने गुंतवणूकदारांच्या (Investors) तोंडचे पाणी पळाले. गुरुवारी बाजाराची सुरुवात प्रॉफिट बुकींगसह (Profit Booking) झाली आणि शेवटपर्यंत हाच ट्रेंड कायम होता. निर्देशांक (Sensex) आज 878.88 अंकांनी घसरला आणि 61799 अंकावर बंद झाला. तर निफ्टीत (Nifty) 245.40 अंकांची घसरण होऊन तो 18414.90 अंकावर आला. जागतिक बाजारातही आज घसरणीचे सत्र होते. त्याचेच प्रतिबिंब भारतीय बाजारावरही दिसून आले.

आज निर्देशांकांची सुरुवातच गडबडत झाली. निर्देशांक 148 अंकाच्या घसरणीसह 62,530 अंकावर उघडला. तर निफ्टीची 46 अंकाच्या घसरणीसह 18,614 अंकावर सुरुवात झाली. या घसरणीवर अमेरिकेतील आजच्या घडामोडींचा प्रभाव दिसून आला.

अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याने तिथल्या बाजारावर त्याचा परिणाम दिसला. तर भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिक मंदीच्या भीतीने विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री सत्र सुरु केले. त्यामुळे बाजारात खळबळ माजली.

हे सुद्धा वाचा

बाजारात आज कोणत्याच सेक्टरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले नाही. निफ्टी आयटी आणि मीडियामध्ये क्रमशः 2.11 आणि 2.08 टक्क्यांची सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली. याशिवाय बँक, आर्थिक सेवा, मेटल, बांधकाम आणि ग्राहकोपयोगी बाजारात 1 टक्क्यांची घसरण दिसून आली.

आज ब्रिटानिया (1.14 टक्के), हीरोमोटोकॉर्प (0.79), एनटीपीसी (0.41), एसबीआय लाईफ (0.33) आणि सनफार्मा (0.07) टॉप गेनर ठरले. तर टेक महिंद्रा (-3.81), टायटन (-2.72), इन्फोसिस (-2.50), ग्रासिम (-2.35) आणि आयशर मोटर्स (2.09) या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी बाजारातील या घसरगुंडीसाठी अमेरिकन घडामोडींकडे लक्ष वेधले. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दर धोरणाचा मोठा परिणाम बाजारावर झाल्याचे त्यांनी सांगितले. आज सर्वाधिक फटका आयटी सेक्टरला बसला. आर्थिक मंदीची भीतीने बाजारावर पुन्हा आक्रमण केले.

कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे बाजारात घसरणीचे सत्र आल्याचे सांगितले. तसेच केंद्रीय बँकेने पुढील वर्षी सुद्धा व्याज दरात वृद्धीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाल्याचे सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.