Share market : शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; आज पुन्हा एकदा सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण; चालू आर्थिक वर्षात कोट्यवधींचा फटका
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात देखील शेअर मार्केट कोसळल्याने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फटका बसला होता.
Share market updates : चालू आर्थिक वर्ष शेअर मार्केटसाठी जेमतेम ठरले आहे. चालू आर्थिक वर्षात काही दिवसांचा अपवाद वगळता शेअर मार्केटमध्ये (Share market) घसरण सुरूच असल्याने गुंतवणूकदारांना (investors) लाखो रुपयांचा फटका बसा आहे. गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली होती. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) घसर पहायाला मिळाली. सेन्सेक्स 56 अकांनी घसरून 52851 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 41अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी 15710 अंकांवर पोहोचला आहे. आज टाटा स्टील, टीसीएस, महिंद्रा अँण्ड महिंद्रा. इन्फोसिस आणि रिलायन्सचे शेअर घसरले. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया देखील घसरला आहे. आज रुपयामध्ये पाच पैशांची घसरण झाली असून, रुपयाचे मूल्य प्रति डॉलर 78.99 च्या स्तारावर पोहोचले आहे.
शेअर बाजाराची पुढील वाटचाल कशी असणार?
शेअर बाजाराची पुढील वाटचाल कशी असणार याबाबत बोलताना जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीके विजय कुमार यांनी म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षातील पहिली तिमाही नुकतीच संपली आहे. जून तिमाहीचा लेखाजोखा कंपन्या लवकरच सादर करणार आहेत. जून तिमाहीमध्ये कंपन्यांना किती नफा झाला, किती तोटा झाला यावर पूर्णपणे पुढील शेअर मार्केटचे गणित अवलंबून असणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस गेल्या तिमाहीमधील आपला लेखाजोखा येत्या 8 जुलै रोजी सादर करणार आहे. त्यानंतर एचसीएल, विप्रो आणि इतर मोठ्या आयटी कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील निकाल जाहीर होणार आहेत. यावरच शेअर मार्केटमधील पुढील गुंतवणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
चालू आर्थिक वर्षात शेअर बाजारामध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे. मागील दोन वर्ष जगासह देशात कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात सर्व उद्योगधंदे ठप्प असल्याने याचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसला होता. मात्र कोरोनाच्या सावटावर मात करून गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टच्यादरम्यान सेन्सेक्स हा 58 हजारांच्या घरात पोहोचला होता. तर निफ्टी देखील 17 हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, आता सेन्सेक्स हा 52851 तर निफ्टी 16 हजारांच्या खाली घसरली आहे. घसरण सुरूच असल्यामुळे गुंतवणुकदारांचे लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.