शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक; सेंसेक्समध्ये 412 अंकाची वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा

शेअर बाजारात (Stock Market today) गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत होती. अखेर या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरण आढाव्यानंतर शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.

शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक; सेंसेक्समध्ये 412 अंकाची वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 6:35 PM

शेअर बाजारात (Stock Market today) गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत होती. अखेर या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरण आढाव्यानंतर शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. आज बहुतांश शेअर (Sensex and Nifty) हे हिरव्या निशानावर बंद झाले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेंसेक्स 412 अंकांच्या वाढीसह 59,447 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील तेजी दिसून आली. निफ्टी 145 अकांच्या वाढीसह 17784 अंकांवर बंद झाली. आज मेटल (Metal Sector) आणि ऑईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. गेल्या तीन दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आज सेंसेक्स आणि निफ्टीच्या घसरणीला ब्रेक लागला असून, शेअर मार्केट वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्केट कॅपमध्ये वाढ

आज शेअरबाजार सुरू होताच रिझर्व्ह बँकेच्या धोरण आढाव्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली. गुरुवारी सेंसेक्स 59,035 वर बंद झाला होता. आज शेअर मार्केट सुरू होताच पहिल्या सत्रात सेंसेक्समध्ये 600 अकांची वाढ झाली. 600 अकांच्या वाढीसह सेंसेक्स 59,654 वर पोहोचला. आज बाजारामध्ये रिलायन्स, आरआएल, च्या शेअरचा बोलबाला राहिला. तर दुसरीकडे एचडीएफसीच्या स्टॉकमध्ये किंचीत घट झाली. आज भारतीय शेअर बाजारामध्ये शेअरच्या घसरणीच्या तुलनेमध्ये दुप्पट शेअर फायद्यात राहीले आहेत. आज शेअर मार्केटमध्ये तेजी असल्यामुळे मार्केट कॅपमध्ये देखील वाढ झाली आहे, मार्केट कॅप 274.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

कोणत्या शेअरमध्ये तेजी?

आज शेअर मार्केट 412 अकांनी वधारले असून, सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीत राहिले. याला अपवाद राहिले ते फक्त आयटी क्षेत्र, आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पहायला मिळाली. मात्र ही घसण अल्प प्रमाणात होती. आज सर्वाधिक वाढ ही मेटल आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअरमध्ये पहायला मिळाली. आज दोनही क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सरासरी दोन टक्क्यांनी वाढले. याचबरोबर ऑटो, फायनान्सशियल क्षेत्रातील कंपन्य आणि बँकिंग क्षेत्रात तेजी पहायला मिळाली.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले

चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.5 टक्के राहणार; ‘ADB’ चा अंदाज

Multibagger Stocks : 36 रुपयांचा शेअर्स पोहोचला 671 रुपयांवर; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.