Stock Market : टांगा पलटी घोडे फरार की भावा, शेअर बाजारात तेजीची हवा फूस, ऑटो सेक्टर लोळले तर या कंपन्यांनी बाजू सावरली..

Stock Market : शेअर बाजाराच्या यू टर्नमुळे अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले..

Stock Market : टांगा पलटी घोडे फरार की भावा, शेअर बाजारात तेजीची हवा फूस, ऑटो सेक्टर लोळले तर या कंपन्यांनी बाजू सावरली..
शेअर बाजाराचा उलटफेरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 5:51 PM

नवी दिल्ली : गेल्या संपूर्ण आठवड्यात नव-नवीन विक्रम करणाऱ्या शेअर बाजाराने (Stock Market Today) आज जबरी यू-टर्न घेतला आणि गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. शेवटच्या दिवशी बाजाराने दाखविलेला हा अवतार अनेकांना धडकी भरवणारा ठरला. BSE Sensex ने पहिल्यांदाच 63,000 अंकाचा टप्पा पार केला होता.  बाजाराच्या शेवटच्या दिवशी बाजार 400 अंकाने (Share Market Down) घसरला.

बीएसई निर्देशांकाने (BSE Sensex) शुक्रवारी सकाळीच त्याची चाल दाखवून दिली. निर्देशांक 62,978.58 अंकावर उघडला. व्यापार सत्र बंद होताना त्यात 415.69 अंकांची घसरण दिसून आली आणि निर्देशांक 62,868.50 अंकावर बंद झाला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर शेअर निर्देशांकाने, निफ्टीमध्ये (NSE Nifty) दिवसभर उसळी मारली नाही. निर्देशांक नरम-गरम राहिला. व्यापारी सत्र संपताना बाजार 116.40 अंकांनी घसरला, तो 18,696.10 अंकावर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

तरीही बाजारात एक वेळ बीएसई निर्देशांक 63,148.59 या उच्चांकी स्तरावर पोहचला होता. तर निफ्टीत ही एक वेळ तेजी दिसून आली, निफ्टीने 18,781.95 अंकाची उच्चांकी कामगिरी केली. त्यावेळी गुंतवणूकदारांना हायसे वाटले.

बाजारात सर्वाधिक नुकसान ऑटो कंपन्यांच्या शेअरचे झाले. बीएसई निर्देशांकामधील सहभागी कंपन्यांमध्ये सर्वाधिक घसरण Mahindra & Mahindra शेअरमध्ये दिसून आली. तर Maruti चा शेअरमध्ये ही मोठी घसरण झाली.

निफ्टीमध्ये Eicher Motors चा शेअर 3.10 टक्के घसरला. तर Mahindra & Mahindra आणि Hero MotoCorp या कंपन्यांच्या शेअरने बाजारात लोटांगण घेतले. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली.

परंतु, सर्वच कंपन्यांनी गुंतवणूकदारांनी निराश केले नाही. काही कंपन्यांनी चांगली तेजी दाखवली. बीएसई निर्देशांकात टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 1.22 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. तर Top-5 Gainer मध्ये टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, इंडसइंड बँक आणि बजाज फिनजर्व यांचा समावेश आहे.

तर एनएसई निफ्टीमध्ये अपोलो हॉस्पिटलच्या शेअरने घौडदौड केली. याशिवाय Top-5 Gainer मध्ये टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, टाटा स्टील आणि ग्रासिमच्या शेअरचा समावेश होता.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.