Share Market : बजेटपूर्वीच शेअर बाजाराने केला 77000 अंकाचा टप्पा पार, शेअर्सने आणले तुफान

Stock Market New High : मंगळवारी सकाळी शेअर बाजारात तुफान तेजी आली. बाजार उघडल्याबरोबर बीएसई सेन्सेक्सने 77,326 नवीन ऑल टाईम हाय लेव्हल गाठली. बजेटपूर्वी बाजाराने दमदार खेळी दाखवली.

Share Market : बजेटपूर्वीच शेअर बाजाराने केला 77000 अंकाचा टप्पा पार, शेअर्सने आणले तुफान
बाजाराची जोरदार घौडदौड
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 10:28 AM

शेअर बाजाराने मंगळवारी सकाळी जोरदार दंडबैठका काढल्या. शनिवार, रविवार आणि सोमवारच्या सुट्टीनंतर बाजार मंगळवारी उघडला. बाजार उघडल्याबरोबर बाजाराने दमदार सुरुवात केली. शेअर बाजाराने नवीन विक्रम नावावर नोंदवला. बजेट 2024 पूर्वीच बाजाराने पुन्हा एकदा 77,000 अंकांचा टप्पा पार केला. बाजाराने नवीन विक्रम नावावर नोंदवला. बाजार सुरु होताच BSE Sensex 200 अंकांपेक्षा अधिकने उसळला. त्याने 77,326 अंकांच्या स्तर गाठला. या नवीन विक्रमाची नावावर नोंद केली.

निवडणूक काळात मोठी पडझड

लोकसभा निवडणूक 2024 या काळात शेअर बाजारात मोठी पडझड दिसली. या चढउताराच्या सत्रात गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लागले. स्टॉक मार्केटमधील हिंदोळ्यांनी गुंतवणूकदारांच्या खिशाला फटका बसला. परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम काढली. मे महिन्यात त्यांनी भारतीय बाजारातून पलायन केले. निवडणूक निकालाच्या दिवशी पण बाजाराने त्याची प्रतिक्रिया नोंदवली. या सर्व घडामोडी होत असताना बाजार मोठा पल्ला गाठेल असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

हे सुद्धा वाचा

सेन्सेक्स-निफ्टी नवीन उच्चांकावर

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 76,992.77 स्तरावर बंद झाला होता. तर मंगळवारी त्याने आल्या आल्याच भरारी घेतली. बीएसई सेन्सेक्स 77,235 अंकावर उघडला. तर काही मिनिटातच त्याने 77,326.80 अंकांचा नवीन स्तर गाठला. सेन्सेक्सप्रमाणेच NSE Nifty ने पण मोठी भरारी घेतली. एनएसई निफ्टी 100 अंकांनी वधारला. निफ्टी 23,573.85 अंकांवर आला. त्याने नवीन उच्चांकाला गवसणी घातली. यापूर्वी शुक्रवारी एनएसई इंडेक्स 23,465 अंकांवर बंद झाला होता.

भारतीय शेअर बाजार चौथ्या क्रमांकावर

भारताने हाँगकाँगकडून जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजाराचा मुकूट पुन्हा मिळवला आहे. ग्लोबल इक्विटी बाजारात हाँगकाँगने बाजी मारली होती. देशातील मार्केट कॅप वाढून 5.21 ट्रिलियन डॉलरवर म्हणजे 4,84,22,02,50 हजार रुपयांवर पोहचला आहे. हाँगकाँग शेअर बाजाराचे मार्केट कॅप 5.17 ट्रिलियन डॉलर इतके आहे. या अगोदर भारताच्या अगोदर जपान 6.30 ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर, चीन 8.84 ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या तर अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेचे मार्केट कॅप 56.49 ट्रिलियन डॉलर इतके आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.