Stock Market : मोठ्या खेळाडुने बाजाराची विकेट पाडली! बाजार ढेपाळला, सेन्सेक्समध्ये 400 अंकाहून जास्त घसरण

Stock Market : शेअर बाजाराची सुरुवात आज पडझडीने झाली. दोन मोठ्या खेळाडूंनी गेम बिघडविला.

Stock Market : मोठ्या खेळाडुने बाजाराची विकेट पाडली! बाजार ढेपाळला, सेन्सेक्समध्ये 400 अंकाहून जास्त घसरण
बाजाराची दिशा कंची?
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:13 AM

नवी दिल्ली : अदानी समूहाचा (Adani Group) एफपीओ रद्द (FPO) करण्याच्या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावर (Stock Market Live Updates) दिसून आले. बाजाराला या निर्णयाचा हादरा बसला. अर्थात या निर्णयाने गुंतवणूकदारांचे नुकसान टळले असले तरी फायद्याचे गणित मात्र बसले नाही. अदानी इंटरप्राईजेसने गुंतवणूकदारंचा पैसा परत करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची (Federal Reserve) महागाई आटोक्यात आणण्याची कसरत सुरुच आहे. या कवायतीला अजूनही परिणामकारक यश आले नाही. त्यामुळे फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची (Basis Points) पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दोन्ही घटकांचा मोठा परिणाम बाजारावर झाला आहे. अमेरिकन डोउ जोंस 6 अंकांच्या तेजीसह बंद झाला. तर नॅसडॅकमध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात मोठा चढउतार दिसून आला. सेन्सेक्समध्ये 1500 अंकांचा चढउतार दिसून आला. तर बँक निफ्टीत 2500 अंकांच्या जवळपास हालचाल दिसून आली. त्यातच अदानी समूहाच्या निर्णयानंतर आज 2 फेब्रुवारी रोजी मोठी घडामोड दिसून आली.

आशियातील बाजारात तेजी दिसून आली. जपानच्या निक्केईमध्ये 0.40 टक्के आणि कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.95 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेनंतर डॉलरला झटका बसला. डॉलर नऊ महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर पोहचला.

हे सुद्धा वाचा

2 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारावर या घडामोडींचा परिणाम दिसून आला. बाजार उघडताच पडझडीला सुरुवात झाली. अनेक शेअर रेड झोनमध्ये व्यापार करत होते. निफ्टीतील अनेक शेअरमध्ये सुरुवातीलाच पडझड सुरु झाली. निफ्टीत 147 अंकांची घसरण दिसून आली.

निफ्टी 17,469.30 अंकानी उघडला. अनेक शेअर लाल रंगात न्हाऊन निघाले. आजच्या व्यापारी सत्राच्या सुरुवातीला ADANI ENT, HDFC LIFE, ADANI PORTS, UPL आणि SBIN मध्ये मोठी घसरण दिसून आली. इतर शेअरही डगमगले.

अदानी समूहाच्या निर्णयानंतर अपेक्षाप्रमाणे बाजाराने प्रतिक्रिया दिली. बाजार निगेटिव्ह नोटवर ओपन झाला. शेअर बाजाराने सुरुवातीलाच लाल निशाण फडकवले. सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 30 शेअरचा सेन्सेक्स घसरला. गुरुवारी सकाळी शेअर बाजार 213.09 अंकानी घसरुन 59,494.99 अंकांवर उघडला.

दरम्यान आज एचडीएफसी, टाटा कंझ्युमर, टाईटन कंपनी, आदित्य बिर्ला कॅपिटल्स, एजिस लॉजिस्टिक्स, अॅपोलो टायर्स, बजाज इलेक्ट्रिकल्स, बर्गर पेट्ंस इंडिया, बिर्लास्फॉट, सेरा सॅनिट्रीवेअर, चोरमंडल्म इंटरनॅशनल, क्रॉम्पटन ग्रीव्हज, डाबूर इंडिया, दिपक फर्टिलायझर, गोदरेज प्रॉपर्टीज, कर्नाटक बँक, मॅक्स इंडिया, एसआयएस, उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक आणि वेलस्पून कॉर्प यांचे निकाल येतील.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.