रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांना ‘फेडरल रिझर्व्ह’चा आधार; शेअर बाजार सावरला
गेल्या आठ दिवसांपासून रशिया (Russia)आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम पडताना दिसून येत आहे. विशेष: युद्धामुळे शेअर बाजाराचे (stock market) कंबरडे मोडले आहे. मात्र गुरुवारी या सर्वातून शेअर बाजार सावरला असून, गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय.
गेल्या आठ दिवसांपासून रशिया (Russia)आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम पडताना दिसून येत आहे. विशेष: युद्धामुळे शेअर बाजाराचे (stock market) कंबरडे मोडले आहे. शेअर बाजारावर विक्रीचा दबाव आहे. भारतात देखील हीच परिस्थिती आहे. शेअर बाजारात गेल्या तीन आठवड्यापासून घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान अशा या नाकारात्मक वातावरणामध्ये यूएस सेंट्रल बँकेच्या एका इशाऱ्यामुळे शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोनही ग्रीन झोनमध्ये आले. यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी काल सांगितले होते की, सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड अस्थिर वातावरण आहे. मात्र तरी देखील व्याजदर वाढवण्यात कोणतीही अडचण नाही. पुढील बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करू शकते असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर शेअर बाजारात अपेक्षित बदत घडून येताना दिसत आहे.
गुंतवणूकदारांना दिलासा
आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने उसळी घेतली. सेन्सेक्स 450 अंकानी वधारला. निफ्टीमध्ये देखील 0.11 टक्क्यांची वाढ झाली. मात्र त्यानंतर काही वेळाच पुन्हा एकदा शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. शेअर मार्केट ओपन होताच सेन्सेक्स 450 अंकानी वधारला होता. मात्र पुन्हा त्यात थोडीशी घसरण होऊन तो 350 अंकांच्या वाढीसह 55,800 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये देखील 110 अंकांची वाढ होऊन निफ्टी 16,700 अकांवर पोहोचला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यासह या आठवड्याच्या बुधवारपर्यंत शेअर बाजारात सातत्याने घसरणच पहायला मिळत होती. मात्र गुरुवारी शेअर बाजार वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापासून आज प्रथमच शेअर मार्केटमध्ये तेजी
बुधवारी शेअर बाजार 778.38 अकांच्या घसरणीसह 55,468.90 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये देखील 87.95 अंकाची घसरण झाली होती. मात्र गुरुवारी शेअर बाजार ओपन होताच सेंन्सेक्स 450 अंकानी वधारला. त्यानंतर सेंन्सेक्समध्ये 150 अकांची घसरण पहायला मिळाली. मात्र कालच्या तुलनेत सेंन्सेक्स 350 अकांनी वधारला असून, सध्या 55,800 अंकावर स्थिरावला आहे. दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील वाढ झाली असून हा गुंतवणूकदारांसाठी दिलासा माणण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव
Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ