Gautam Adani | गौतम अदानी यांना ‘सुप्रीम’ दिलासा! हिंडनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच राहणार

Gautam Adani | उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हिंडनबर्ग प्रकरणात दिलासा दिला. याबाबतीत जर जाणून-बुजून नियमांचे उल्लंघन झालं असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे कोर्टाने स्पष्ट केले. सेबीच्या तपासामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

Gautam Adani | गौतम अदानी यांना 'सुप्रीम' दिलासा! हिंडनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच राहणार
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 11:49 AM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : उद्योगपती गौतम अदानी यांना सुप्रीम दिलासा मिळाला आहे. हिंडनबर्ग प्रकरण गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच अदानी समूहाच्या मानगुटीवर बसलेले आहे. ते काही उतरण्याचे नाव घेत नाही. पण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अदानी यांना मोठा दिलासा दिला. प्रकरणात बाजार नियंत्रक सेबी ही एक सक्षम यंत्रणा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. सेबीच्या तपासात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. उरलेल्या दोन केसबाबत तपास करण्यासाठी सेबीला सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. याप्रकरणी एसआयटी अथवा सीबीआयला तपास द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

निकालपत्रातील मुद्दे काय

  • OCCPR च्या अहवालाआधारे SEBI च्या तपासावर संशय व्यक्त करता येत नाही
  • सर्वोच्च न्यायालयाने इतर दोन प्रकरणांचा तीन महिन्यात तपासाचे निर्देश दिले
  • सेबीने याप्रकरणात 24 तपासांपैकी 22 तपासांचा अहवाल सादर केला
  • तर दोन अंतरिम रिपोर्ट अगोदरच मांडले आहेत
  • कोर्टाने हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यास नकार दिला
  • सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे, सीबीआयकडे सोपविण्यास नकार दिला

काय आहे प्रकरण

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधात जानेवारी 2023 मध्ये आरोपांची राळ उडाली होती. अमेरिकेची शॉर्टसेलर संस्था हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनियमिततेचे आरोप केले होते. अदानी समूहाने शेअरच्या किंमती फुगवल्याचा प्रमुख आरोप होता. त्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकार अदानी समूहाला वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आरोपांमुळे अदानी समूहाचे शेअर धडाधड कोसळले. कंपनीने अनेक शेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप हिंडनबर्गने केला होता. अदानी समूहाने हा आरोप फेटाळला.

कंपनीला 150 अब्ज डॉलरचा फटका

हा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र आरंभिले. कंपनीचे मार्केट कॅप झपाट्याने खाली आले. त्यावेळी कंपनीचे बाजारातील भांडवल 150 अब्ज डॉलरने घसरले. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. न्यायालयाने तपासासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित केली. गेल्या काही दिवसांत अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर चांगली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सूटकेचा निश्वास टाकला आहे.

राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.