स्विगीचे नवीन एप SNACC लाँच, अवघ्या 15 मिनिटांत जेवण पोहचविणार

Swiggy SNACC: स्विगीचे नवी ॲप SNACC लाँच केले असून ते ताजे गरमागरम अन्नपदार्थ, शीतपेये आणि स्नॅक्स अवघ्या 15 मिनिटांत तुमच्या दारापर्यंत पोहोचविणार आहे.

स्विगीचे नवीन एप SNACC लाँच, अवघ्या 15 मिनिटांत जेवण पोहचविणार
SNACC
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 7:44 PM

फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी करणारी ऑनलाईन कंपनी स्विगीने एक नवीन एप लाँच केले आहे. या एपचे नाव SNACC असे आहे. हे नवीन एप ताजे जेवण आणि पेय आणि क्विक बाईट्स सारखे स्नॅक्स केवळ १५ मिनिटात तुमच्या घरी पोहचवणार आहे. स्विगीसाठी हे एप नवीन दिशा घेऊन आली आहे.कारण आतापर्यंत स्विगीच्या सर्व सेवा एकाच एप अंतर्गत दिल्या जात होत्या. त्यात फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्ससाठी स्विग इंस्टामार्ट, हायपर लोकल डिलिव्हरी किंवा डायनिंग आऊटचे सर्व ऑप्शन एकाच एप अंतर्गत येत होत्या…

एप कसे दिसते ?

SNACC एप पाहिल्यावर समजते की 7 जानेवारीपासून हे एप लाईव्ह झाले. या  एपचा रंग ब्राईट फ्लोरिसेंट हिरव्या रंगाच्या बॅकग्राऊंडसह येत आहे. ज्यावर डार्क ब्ल्यू रंगाची अक्षरं दिसत आहेत.

कुठून झाली सुरुवात

स्विगीने आपले होम बेस म्हणजे बंगळुरु येथून या नवीन एपच्या सेवेची सुरुवात केली आहे. लवकरच देशात इतरत्र देखील हे एप सुरु होणार आहे. स्विगीच्या स्वत:च्या SNACC एपला अन्य रिजनमध्येही लवकरच सुरु करण्याची योजना असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

क्विक कॉमर्सपासून फूड डिलिव्हरी व्यवसाय वेगळा होतोय

ब्लिंकिटचे बिस्ट्रो, झेप्टोचे कॅफे एण्ड स्विश सारख्या सर्व मोठ्या कंपन्या आप -आपल्या एपचे दोन भागात विभागणी किंवा दुप्पट करीत आहे. यात खास करुन क्विक कॉमर्सच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाला वेगळे केले जात आहे. कंपन्या रॅपिड फूड डिलिव्हरीच्या बाजारात लवकरात लवकर उतरु इच्छीत आहे. ज्यामुळे या क्षेत्रात वाढत्या युजर्स आपल्याकडे खेचण्याची कंपनीची योजना आहे.

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म सारख्या ब्लिंकिटची मालकी झोमॅटो जवळ आहे. झेप्टो आपल्या फूड डिलिव्हरी व्यवसायासाठी वेग-वेगळे एप लाँच करीत आहे. याद्वारे आपली ग्राहक संख्या वाढविण्याबरोबरच यांचे लक्ष्य क्विक कॉमर्सपासून फूड डिलिव्हरी बिझनेसला वेगळे करुन ऑपरेट करुन जास्तीत जास्त व्यवसाय वाढविण्याची कंपन्यांची योजना आहे.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.