AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata | फोर्डला पण झुकावे लागले, रतन टाटा यांनी असे ठेचले नाक

Ratan Tata Birthday | रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. टाटा समूह रतन टाटा यांच्याशिवाय कधी पूर्ण होऊच शकत नाही. या समूहासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. पण असे करताना त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला नाही, त्याचे एक हे जबरदस्त उदाहरण आहे.

Ratan Tata | फोर्डला पण झुकावे लागले, रतन टाटा यांनी असे ठेचले नाक
| Updated on: Dec 28, 2023 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : टाटा हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आहे. टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. त्यांची विनम्रता, सहनशीलता, विनयशीलता, औदार्य, देशभक्ती अशा अनेक गुणांवर देशातील तरुणाई फिदा आहे. 28 डिसेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला होता. ते अनेकांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांचे अनेक किस्से आहेत. 90 च्या दशकात पॅसेंजर कार सेगमेंट आपटले. रतन टाटा ही कंपनी विक्री करण्याच्या तयारीत होते. फोर्ड कंपनीला टाटाची मोटर्स विक्रीची तयारी करण्यात आली. पण याविषयीच्या बैठकीत असे काही झाले की, रतन टाटा यांनी विक्रीचा निर्णय रद्द केला आणि आज कंपनीने कमाईत झेंडे गाडले आहेत.

अन् त्यांनी विक्री थांबवली

हा किस्सा 90 च्या दशकातील आहे. टाटा इंडिका बाजारात कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे कंपनीत घाट्यात पोहचली. रतन टाटा हे टाटा मोटर्स विक्री करणार होते. त्यांनी अमेरिकेतील फोर्ड मोटर्सशी बोलणी केली. त्यांनी बिल फोर्ड यांच्याशी बैठक केली. त्यावेळी फोर्ड यांनी टाटा यांना व्यावसायिक ज्ञान कमी असल्याचा टोला लगावला. ज्या व्यवसायाची माहितीच नाही, ती सुरु करण्यात काय हाशील केले, असा उपरोधीक टोला फोर्ड यांनी लगावला. हा व्यवसाय खरेदी करुन आपण जणू टाटा यांच्यावर उपकार करत आहोत, असा त्यांचा आविर्भाव होता.

शब्द मनाला टोचले

बिल फोर्ड यांचे शब्द रतन टाटा यांना आवडले नाहीत. त्यांनी लागलीच टाटा मोटर्स विक्रीचा निर्णय रद्द केला. त्यांनी ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा तयारीनीशी उतारण्याचा चंग बांधला. त्यांच्या संघर्षाला, दुरदृष्टीला यश आले. आज ऑटो सेक्टरमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे. टाटा मोटर्सने ईव्ही सेक्टरमध्ये तर मोठी झेप घेतली आहे. टेस्ला सारख्या कंपन्यांना टाटा मोटर्स टफ फाईट देण्याच्या तयारीत आहे.

असा घेतला बदला

पुढे अवघ्या 9 वर्षांतच बिल फोर्ड यांना टाटा यांच्या कौशल्यासमोर झुकावे लागले. एका तपाच्या आतच त्यांनी फोर्डला मोठा दणका दिला. दहा वर्षात फासे पलटले. Ford Motors दिवाळीखोरीच्या वाटेवर पोहचली. टाटा समूहाने फोर्ड यांची Jaguqr आणि Land Rover हे दोन ब्रँड ताफ्यात घेतले. ते खरेदी केले. बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले. हे दोन ब्रँड खरेदी करुन रतन टाटा यांनी आमच्यावर उपकार केल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.