Project : राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरु, पण प्रकल्प हातचा गेल्याने राज्याला बसला इतक्या कोटींचा फटका..

Project : वेदांतानंतर नागपूरचा टाटा-एअरबस प्रकल्प हाताबाहेर गेल्याने राज्याचे इतक्या कोटींचे नुकसान झाले..

Project : राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरु, पण प्रकल्प हातचा गेल्याने राज्याला बसला इतक्या कोटींचा फटका..
इतक्या कोटींचे नुकसानImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 9:11 PM

नवी दिल्ली : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गेला. आता नागपूरमधील टाटा-एअरबस प्रकल्पही (Tata Airbus Project) निसटला. यावरुन राज्यातील राजकारण (Politics) तापले आहे. आरोपांच्या जोरदार फैरी सुरु आहे. आरोप होत राहतील, राजकारणही होत राहील, पण राज्याचे यामुळे किती नुकसान झाले त्यावरही एक नजर टाकुयात..

टाटा-एअरबस प्रकल्प राज्याबाहेर, गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प तब्बल 22,000 कोटी रुपयांचा होता. हा सध्या राज्य सरकारला दुसरा मोठा झटका मानण्यात येत आहे. यापूर्वी 1.5 लाख कोटी रुपयांचा वेदांत-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमधील बडोद्यात या प्रकल्पाची कोनशिला ठेवणार आहेत, पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे ही उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या प्रकल्पातंर्गत सी-295 हे वाहतूक विमान तयार करण्यात येईल. त्यासाठी भारतीय वायुसेनेने 2021 मध्ये 21,935 कोटी रुपयांचा करार केला होता. टाटा कंपनी त्यासाठी बडोद्यात प्रकल्प उभारत आहे.

या प्रकल्पातून 56, सी-295 विमान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीने एअरबस या युरोपियन कंपनीसोबत करार केला आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका असून त्या तोंडावर हे दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये होत आहेत.

याप्रकल्पातून भारतीय बनावटीचे वाहतूक विमान सप्टेंबर 2026 मध्ये मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. सी-295एमडब्ल्यू या विमानाची 5-10 टन क्षमता आहे. हे विमान जवळपास 70 सैनिकांना घेऊन जाऊ शकते.

टाटा-एअरबस प्रकल्प नागपूर येथे होणार होता. त्यासाठी जमीनही मागण्यात आली होती. पण हा प्रकल्प गुजरातकडे गेला. त्यामुळे हजारो रोजगार महाराष्ट्राच्या हातून गेले एवढं मात्र नक्की.

Non Stop LIVE Update
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.