Tata Dividend | टाटा समूहातील या कंपनीचा धमाका, 81 व्या वेळा देणार डिव्हिडंडचे गिफ्ट
Tata Dividend | टाटा समूहातील या दिग्गज कंपनीने कमाल केली आहे. कंपनीने लाभांश देण्यात नवीन रेकॉर्ड केला आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना 81 व्या वेळा देणार डिव्हिडंड देत आहे. ही कंपनी 1 शेअरवर गुंतवणूकदारांना 9 रुपयांचा लाभांश देणार आहे. कंपनीने याविषयीची घोषणा केली आहे. यापूर्वी बोनस शेअरचे गिफ्ट पण कंपनीने दिले होते.
नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : टाटा समूहाताली या दिग्गज कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची मने जिंकली आहेत. कर्मचारी, अधिकारी तर या कंपनीवर जाम खूश आहेत. आता गुंतवणूकदार पण खूश झाले आहेत. कारण कंपनीने यापूर्वीच लाभांश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनी 1 शेअरवर 9 रुपयांचा लाभांश देणार आहे. ही कंपनी 2007 पासून सातत्याने गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे. कंपनीने 81 व्या वेळा डिव्हिडंड देण्याचा पराक्रम केला आहे. असा अनोखा रेकॉर्ड करणारी ही हटके कंपनी टाटा समूहातील घौडदौड करणारी कंपनी आहे. आज 19 ऑक्टोबर ही लाभांश देण्याची रेकॉर्ड डेट आहे. लवकरच गुंतवणूकदारांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
ही आहे कंपनी
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा पसारा जगभर पसरला आहे. अनेक देशात मोक्याच्या ठिकाणी कंपनीचे कार्यालय आहे. परदेशात पण मोठा कर्मचारी वर्ग आहे. कंपनीने डिव्हिडंडची माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीने 1 शेअरवर 9 रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र गुंतवणूकदारांना 7 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत लाभांश देण्यात येईल. या आर्थिक वर्षात कंपनी दुसऱ्यांदा अंतरिम लाभांश देणार आहे.
असा झाला नफा
टीसीएसने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 11,432 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 10,431 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 8.7 टक्के वाढ झाली आहे. जूनच्या तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा 11,074 कोटी रुपये होता.
दोनदा बोनस शेअरचे गिफ्ट
टीसीएसने लाभांशच नाही तर बोनस शेअरचे पण गिफ्ट दिले आहे. टीसीएसने 2009 आणि 2028 मध्ये पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्ट दिले. कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर एका शेअरचा बोनस दिला आहे. कंपनीच्या लाभांशामुळे गुंतवणूकदार सध्या खुशीत आहेत. त्यांना कंपनीने इतक्या वर्षात अनेकदा कमाईची संधी मिळवून दिली आहे. आज बाजारात मोठी पडझड झाली. त्यात टीसीएसचा शेअर घसरला. दुपारी दोन वाजेच्या जवळपास हा शेअर 3,463.15 रुपयांवर ट्रेड करत होता.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.