AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super app : ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ ला ही मागे टाकेल, टाटा चे सुपर अ‍ॅप Neue..

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी सांगितले की, समूहाचे नुकतेच लाँच केलेले ‘सुपर अ‍ॅप Neue’ हे ओपन स्ट्रक्चरवर आहे आणि इतर कंपन्यांच्या ब्रँडनाही ते जोडण्यास अनुमती देईल. टाटा ने 7 एप्रिल रोजी नवीन सुपर अ‍ॅप सादर केले असून, सध्या ते ग्रुपच्या किराणा, हॉटेल्स इत्यादींकडील उत्पादने आणि सेवा देत आहे

Super app : ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ ला ही मागे टाकेल, टाटा चे सुपर अ‍ॅप Neue..
टाटा चे सुपर अ‍ॅप NeueImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:33 PM

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी सांगितले की समूहाचे नुकतेच लाँच झालेले सुपर अ‍ॅप Neue (Super App Neue) हे ओपन स्ट्रक्चरवर आहे आणि ते इतर कंपन्यांनाही मदत करेल. या अ‍ॅपला ब्रँड देखील जोडले जाऊ शकतात. टाटा ने 7 एप्रिल रोजी सुपर अ‍ॅप Neue सादर केले आणि सध्या ग्रुपच्या व्यावसायिक कंपन्यांकडून (commercial companies)उत्पादने आणि सेवा ऑफर करते आहे. यात, किराणा, हॉटेल्स इत्यादींचा समावेश आहे. टाटा डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक पॉल म्हणाले की, अ‍ॅपने 21 लाख डाउनलोड आणि उल्लेखनीय डील मिळवल्या आहेत, ज्यामुळे ग्रुप एक्झिक्युटिव्ह ही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. WEB 5 HIN चे चंद्रशेखरन म्हणाले की हे अ‍ॅप ओपन फ्रेमवर्कवर आहे आणि त्यात टाटा समूहाव्यतिरिक्त इतर कंपन्यांचे ब्रँड देखील असतील. सध्या त्यावर काही समूह कंपन्यांची (group companies) उत्पादने आणि सेवा उपलब्ध आहेत.

किराणा मालापासून ते हॉटेल, एअरलाइन्सपर्यंत सुविधा

पुढील काही महिन्यांत इतर समूह कंपन्यांच्या ऑफर सुपर अ‍ॅप Neue ला जोडल्या जातील. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या (फीडबॅक) आधारे इतर कंपन्यांच्या उत्पादनांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार असून, किराणा मालापासून ते हॉटेलपर्यंत, एअरलाईन तिकीट बुकिंगची सुविधाही यात उपलब्ध असेल. चंद्रशेखरन पुढे म्हणाले की, या सुपर अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रुपच्या किराणा मालापासून ते हॉटेल, एअरलाइन्सपर्यंत तिकीट बुकिंग आणि औषधे. इत्यादीची विक्री एकाच व्यासपीठावर करण्यात येईल. आगामी काळात ते Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना कठीण स्पर्धा देऊ शकते. तथापि, Amazon आणि Flipkart हे तटस्थ प्लॅटफॉर्म आहेत जे वेगवेगळ्या विक्रेत्यांना संधी देतात, ग्राहकांना एकाच वेळी अनेक पर्याय देतात. ग्रुप कंपनीच्या किराणा व्यवसाय बिग बास्केट आणि फार्मास्युटिकल व्यवसाय 1 एमजीचा संदर्भ देत पॉल म्हणाले की, सुपर अ‍ॅप Neue वर विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. पण ते इतर कंपन्यांच्या ऑफर्सकडेही लक्ष देतील.

मोठे ब्रँड या नवीन प्लॅटफॉर्मवर येतील

इंडिगो किंवा ओबेरॉय हॉटेल्सची ऑफर प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल का, असे विचारले असता टाटा डिजिटलचे अध्यक्ष मुकेश बन्सल यांनी याविषयी आधीच चर्चा झाल्याचे संकेत दिले. एअर एशिया, बिग बास्केट, क्रोमा, आयएचसीएल, स्टारबक्स, टाटा 1 एमजी, टाटा क्लीक, टाटा प्ले, वेस्टसाइट सारख्या टाटा ब्रँड या नवीन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. विस्ताराच्या दृष्टीने, लवकरच एअर इंडिया, टायटन, टाटा मोटर्स आदी कंपन्याही त्यात सामील होतील. टाटा सन्स गेल्या वर्षभरापासून अ‍ॅपची चाचणी करत होती. कारण ते वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रात मोठी भूमिका बजावू इच्छित आहेत. या भागामध्ये समूहाने अनेक ऑनलाइन कंपन्याही विकत घेतल्या आहेत. यामध्ये किराणा सामान वितरण प्लॅटफॉर्म बिग बास्केट आणि ऑनलाइन फार्मसी कंपनी 1mg समाविष्ट आहे. पॉलच्या मते, देशातील सर्व ग्राहक त्यांच्या गरजेनुसार अ‍ॅपवर खरेदी करू शकतील याची खात्री करणे हे समूहाचे अंतिम ध्येय आहे.

इतर बातम्या

Special Report: अजान विरुद्ध हनुमान चालीसा! महाराष्ट्रात तणावाचा भोंगा

Gunratna Sadavarte : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता पुणे पोलिसही अॅड गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता

Kishori Pednekar: नवनीत राणा किशोरी पेडणेकरांच्या प्रश्नाचं उत्तर देतील? जय श्री रामच्या घोषणेवरुन हल्लाबोल

'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.