तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स भरावे लागतात. 

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स...
सोने चांदी दर
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देतात. कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात.  (Tax Rules To Selling And buying Gold)

जर आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.

कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो

दोन्ही रितीने कॅपिटल्स गेन टॅक्सचं कॅलक्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे असते. जर खरेदीच्या 36 महिन्यांच्याअगोदर सोने विक्रीला काढले तर कॅपिटल्स गेन टॅक्स आपल्या मूळ किमतीवर जोडला जातो. आपण ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्याच्यानुसार आपल्याला टॅक्स चुकवावा लागतो. जर तुम्ही खरेदीच्या 36 महिन्यांच्या नंतर विक्री करत असाल तर त्यावर 20 टक्के टॅक्स लागतो. त्यावर सरचार्ज आणि एज्युकेशन सेस देखील लागतो. पाठीमागच्या सादर झालेल्या बजेटमध्ये LTCG वर सेस 3 टक्क्यांवरुन 4 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे ज्यामुळे आता LTCG वर 20.80 टक्के इतका टॅक्स लागतो.

50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स नाही

जर कॅपिटल गेनऐवजी कॅपिटल लॉस झाला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या किमतीला आपण सोने खरेदी केले तेवढ्याच किमतीला आपल्या सोन्याची विक्री झाली तर टॅक्समध्येही आपल्याला सूट मिळते. भारतीय संस्कृतीत सोने शुभ मानले जाते. अनेक जण आपल्या प्रियजणांना सोने गिफ्ट स्वरुपातही देतात. एका आर्थिक वर्षात गिफ्टच्या रुपात 50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स लागत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात (Gold international rate) किरकोळ वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1900 डॉलरवर पोहचले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं 0.10 डॉलरच्या वाढीसह 1901.60 डॉलर प्रति आऊंसवर पोहचलं. मार्चमध्ये बाजारात येणाऱ्या चांदीचे दर (Silver international rate) 0.002 डॉलरच्या घटीसह 26.52 डॉलर प्रति आऊंसवर पोहचले आहेत. (Tax Rules To Selling And buying Gold)

संबंधित बातम्या

Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!

Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव…

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.