AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीमुळे वाचेल Income Tax, खरेदी करा Electoral Bond

Electoral Bond Tax Saving | लोकसभेचा बिगूल केव्हा पण वाजेल. आयकर वाचविण्यासाठी करदात्याची धडपड सुरु असते. तो सातत्याने त्यासाठी संधी शोधतो. निवडणूक रोख्यातून त्याला ही संधी मिळते. कर बचत म्हणजेच एक प्रकारे कमाईच आहे. तेव्हा या निवडणूकीत ही संधी सोडू नका..

लोकसभा निवडणुकीमुळे वाचेल Income Tax, खरेदी करा Electoral Bond
| Updated on: Feb 03, 2024 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली | 3 February 2024 : पैसा कमविणे आणि बचतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच. करदाते तर किती कर बचत करता येईल. कुठे सवलत मिळेल आणि बचतीतून फायदा होईल, याची संधी शोधतात. लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता लवकरच वाजतील. लोकसभा अथवा राज्यातील विधानसभेच्या निवणुका असतील तरी करदात्यांना, कर वाचविण्याची आयती संधी मिळते. त्यांना निवडणूक रोख्यातून कर बचतीची आयती संधी मिळतेच, पण असा फायदा ही होतो.

काय आहेत निवडणूक बाँड

तर सरकार दरवर्षी निवडणूक बाँड, निवडणूक रोखे बाजारात आणते. निवडणुकीपूर्वी हे बाँड (Electoral Bond) बाजारात आणण्यात येतात. त्याची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. अंदाजानुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार पुन्हा एकदा निवडणूक रोखे घेऊन येईल. त्यामाध्यमातून तुमच्या आवडत्या राजकीय पक्षाला देणगी अथवा निधी देऊ शकता.

यावर परतावा मिळतो का?

हा बाँड इतर बाँडसारखा परतावा देत नाही. निवडणूक रोख्यांवर व्याजाचा परतावा मिळत नाही. तुम्हाला आवडत्या राजकीय पक्षाला देणगी देता येते. त्याबदल्यात हा पक्ष तुम्हाला पोच पावती देईल. पण हे एकप्रकारचे दान म्हणा, मदत म्हणा, तुम्ही प्रेमापोटी मोजलेली किंमत म्हणा, ही देणगी देता येते. ती परत मागता येत नाही अथवा त्यावर तुम्हाला व्याजही मिळत नाही.

तुम्हाला मिळणार हा फायदा

राजकीय पक्षाला मदत करण्यापुरतं ठीक आहे. पण त्यातून काहीच फायदा होणार नाही का? तर तुम्हाला हा बाँड खरेदी केल्यास फायदा मिळू शकतो. आवडत्या राजकीय पक्षाला देणगी दिल्यानंतर तुम्हाला पोचपावती देण्यात येईल. आयकर सवलतीसाठी त्याचा वापर होतो. आयकर कलम 80जीजीसी आणि 80जीजीबी अतंर्गत इलेक्टोरल बाँडवर कर सवलत मिळवता येते. जितकी देणगी द्याल, त्यावर तुम्हाला कर सवलत मिळते.

ही गोष्ट ठेवा लक्षात

  1. कर बचतीसाठी निवडणूक रोखे हा चांगला पर्याय
  2. पूर्ण देणगीवर तुम्हाला कर सवलत मिळते
  3. बाँड खरेदीसाठी केवायसी करणे अनिवार्य
  4. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येते
  5. तुम्ही कोणत्या पक्षाला देणगी दिली हे समोर येत नाही
  6. पक्षांना देणगी मिळावी यासाठी रोखे आणण्यात येतात
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.