टीसीएसचा जागतिक ठसा, आयटीमधील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरातील आयटी सर्व्हिस (IT service) क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्हॅल्यू ब्रँड (बाजार मूल्यांकन) ठरला आहे.

टीसीएसचा जागतिक ठसा, आयटीमधील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 8:37 PM

नवी दिल्ली :  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरातील आयटी सर्व्हिस (IT service) क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्हॅल्यू ब्रँड (बाजार मूल्यांकन) ठरला आहे. ‘ब्रँड फायनान्स’ चा रिपोर्ट नुकताच घोषित करण्यात आला आहे. टाटा कन्सल्टन्सी व्यतिरिक्त यामध्ये भारतातील अन्य आयटीमधील बड्या कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये इन्फोसिस (Infosys) आणि अन्य चार टेक कंपन्यांनी टॉप 25 आयटी सर्व्हिसेस ब्रँडमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आयटी क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी मानली जाते. ब्रँड फायनान्सच्या रिपोर्टमध्ये अ‍ॅक्सेंच्युअर आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर इन्फोसीसही वेगाने विस्तार पावणारी आयटी कंपनी ठरली आहे. दरवर्षी आयटी सर्व्हिस कंपन्यांचं रिपोर्ट कार्ड ब्रँड फायनान्स जाहीर करते. यंदाच्या वर्षीच्या अहवालाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात

1. जगातील सर्वाधिक वेगाने विस्तार होणाऱ्या पहिल्या 10 आयटी सर्व्हिसेस ब्रँडमध्ये भारतातील 6 ब्रँड सहभागी आहेत. 2. जगात अ‍ॅक्सेंच्युअरचे (Accenture)नाव पहिल्या स्थानावर आहे. अ‍ॅक्सेंच्युअरचा ब्रँड वॅल्यू 36.2 बिलियन डॉलर आहे. 3. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ब्रँड वॅल्यू 16.8 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. 4. वर्ष 2020 ते 2022 दरम्यान अमेरिकन आयटी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचा विकास दरात 7 टक्क्यांच्या फरक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 5. गेल्या वर्षात टीसीएसची 12 टक्के आणि वर्ष 2020 नंतर 24 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

कर्मचारी प्रथम धोरण

ब्रँड फायनान्सच्या अहवालात टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या विकासात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात वेतनवाढ जाहीर करणारी टीसीएस ही पहिली आयटी सर्व्हिसेस कंपनी ठरली होती. कोविड प्रकोपाच्या काळात टीसीएसच्या क्लाउड सर्विसेससाठी सर्वाधिक मागणी नोंदविली गेली होती. त्यामुळे कंपनीच्या गंगाजळीत मोठी भर पडली होती.

1968 मध्ये झाली कंपनीची स्थापना

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर अधिराज्य राहिले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना जे. आर. डी. टाटा यांनी 1968 मध्ये केली. टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली संस्था आहे. टीसीएसचा विस्तार जगभरात आहे. 116,308 कर्मचारी, 47 देशातील कार्यालये आणि 5.7 अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था आहे.

संबंधित बातम्या

Gold price Today : सोन्यात गुंतवणूक करायची? जाणून घ्या- मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील आजचे भाव

OYOचा IPO लवकरच बाजारात, बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली

Investment Planning | डिव्हिडंड फंड की ग्रोथ फंड, दोघांमध्ये कोण आहे बेस्ट? जाणून घ्या!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.