सोन्याने दिला जोरदार परतावा, 20 वर्षांत असे केले मालामाल

Gold Return | गेल्या 20 वर्षांत सोन्याने जोरदार परतावा दिला आहे. बँकेतील एफडी, आरडीतील परतावा यापुढे काहीच नाही. सोन्याने या दीर्घ कालावधीत मोठा पल्ला गाठला. ज्यांनी 20 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली, ते आज करोडपती झाले आहेत. त्यांना गाठिशी मोठी रक्कम असल्याने त्यांची उतारवयातील चिंता कमी झाली आहे.

सोन्याने दिला जोरदार परतावा, 20 वर्षांत असे केले मालामाल
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 10:45 AM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ज्यांनी काही वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली ते आज लक्षाधीश, कोट्याधीश झाले आहेत. त्यांचा सोन्यातील गुंतवणुकीचा निर्णय योग्य ठरला आहे. संकटकाळात सोने हे कामी येते. मोठा खर्च आला तर सोन्यासारखी दुसरी कोणती गुंतवणूक नाही. आर्थिक संकटात तर हा सर्वात सुरक्षित पर्याय मानण्यात येतो. सोन्याने परताव्यातून ही बाब सिद्ध केली आहे. सोन्याने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना सरासरी 11 टक्क्यांचा चक्रवाढ परतावा दिला आहे.

एका वर्षात 20% रिटर्न

गेल्या दिवाळीपासून ते आतापर्यंत सोन्याने जवळपास 20 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हे बंपर रिटन आहे. पुढील दिवाळीपर्यंत सोने जोरदार रिटर्न देण्याची शक्यता आहे. एक्सपर्ट्सनुसार पुढील एका वर्षात सोने जवळपास 19 टक्के परतावा देईल. सोन्याच्या किंमती गेल्या महिन्यात जोरदार वधारल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

1 लाखाचे झाले 6.79 कोटी

1947 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव केवळ 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सोन्याने 67,953 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तुमच्या यापूर्वीच्या पिढीने 1947 मध्ये सोन्यात एक लाखांची गुंतवणूक केली असती तर आज या सोन्याची किंमत 6.79 कोटी रुपये असती. काही कुटुंबांमध्ये पिढीजात दागिन्यांची परंपरा आजही आहे. त्यांना तर आता लॉटरीच लागलेली आहे.

दिवाळीत वाढणार मागणी

दरवर्षी दिवाळीत सोन्याची मागणी वाढते. विंडमिल कॅपिटलच्या याविषयीच्या अहवालानुसार, भूराजकीय अस्थिरतेमुळे यंदा सोन्यात तेजी येऊ शकते. बाजारात जेव्हा पण मोठी उलाढाल होते. चढउतार होतो. त्यावेळी गुंतवणूकदार अगोदर सोने खरेदी करतो. कोविड, रशिया-युक्रेन युद्धात निफ्टीतील परतावा कमी होता. पण सोन्याने या काळातही चांगला परतावा दिला. त्यामुळे सोने संकटकाळात चांगला परतावा देते हे समोर आले आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,540 रुपये, 23 कॅरेट 60,298 रुपये, 22 कॅरेट सोने 55,455 रुपये झाले. 18 कॅरेट 45,405 रुपये, 14 कॅरेट सोने 35,416 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,209रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.