Pay Commission : विसरुन जा 7th Pay Commission, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी!

Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

Pay Commission : विसरुन जा 7th Pay Commission, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी!
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 4:13 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central government employees) लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मोदी सरकार त्यांच्यावर मेहरबान होणार आहे. केंद्र सरकार त्यांना खूशखबर देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानंतर (7th pay commission) 8व्या वेतन आयोगाची (8th pay commission) चर्चा सुरु आहे. या केवळ चर्चा नाहीत. याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करु शकतात. कॅबिनेटने डीएला मंजूरी दिल्यानंतर महागाई भत्यात मोठी वाढ होईल. कर्मचाऱ्यांच्या खात्यात भलीमोठी रक्कम जमा होईल.

8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठा फायदा होऊ शकते. पुढील वर्षी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. आतापर्यंत 8वा वेतन आयोग आलेला नाही. पण 7 वा वेतन आयोग आल्यानंतर 8 वा वेतन आयोग येईल, अशी आशा आहे. अर्थात केंद्र सरकारने अधिकृतरित्या याविषयीची माहिती दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार याविषयीची लवकरच घोषणा करु शकते. कर्मचाऱ्यांनी मागणी रेटून धरल्याने हा वेतन आयोग लागू होऊ शकतो.

पगारात होईल वाढ सूत्रांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळेच केंद्र सरकार नवीन वेतन आयोग गठित करु शकते. 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. वेतन वाढीची पूर्ण जबाबदारी वेतन आयोगावर असेल. 2024 च्या सार्वजनिक निवडणुकीपूर्वी वेतन आयोगाचे अध्यक्ष त्याची घोषणा करतील.

हे सुद्धा वाचा

8th Pay Commission मध्ये किती वाढेल पगार 7वा वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात मोठी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. जर सर्वकाही ठीक झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढून तो 3.68 पटीने वाढेल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात (Basic Salary) 44.44% वृद्धी होऊ शकते.

महागाई भत्ता इतका वाढेल कॅबिनेटने डीएला मंजूरी दिल्यानंतर महागाई भत्यात मोठी वाढ होईल. कर्मचाऱ्यांच्या खात्यात भलीमोठी रक्कम जमा होईल. तसेच कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी (Arrears) मिळेल. 4 टक्के डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपये प्रति महिन्यापासून ते 2276 रुपये प्रति महिना मोठा फायदा होईल.

जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 720 रुपये प्रति महिना वाढ होईल. कर्मचाऱ्याच्या वेतनात वार्षिक एकूण 8640 रुपयांची वाढ होईल. तर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56900 रुपये प्रति महिना असेल तर त्यांच्या वेतनात दरमहिन्याला 2276 रुपयांचा फायदा होईल. कर्मचाऱ्याच्या वेतनात वार्षिक एकूण 27312 रुपयांची वाढ होईल.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....