Electric Car | Tata Motors आणणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून तुम्हाला आनंद होईल
Electric Car TATA | टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र यांनी ही माहिती दिली. Tigor EV पेक्षा ही कार स्वस्त असेल. Tigor EV ची 12.5 लाखांपासून सुरुवात होते.
Electric Car TATA | टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र (Shailesh Chandra) यांनी ही माहिती दिली. Tigor EV पेक्षा ही कार स्वस्त असेल. Tigor EV ची 12.5 लाखांपासून सुरुवात होते.
इलेक्ट्रिक बाजारापुढे आव्हान
सध्याच्या इलेक्ट्रिक चारचाकी बाजारात सर्वात मोठे आव्हान आहे ते किंमतींचे. इलेक्ट्रिक कार सर्वांनाच दारी हवी आहे. पण या कारची किंमत सर्वसामान्यांच्या आजही आवाक्याबाहेर आहे.
हॅचबॅक सेगमेंटमध्ये एंट्री
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार हॅचबॅक सेगेमेंमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक ही कार खरेदी करु शकेल. हॅचबॅक सेगमेंटमध्ये ही कार आल्यास त्याचा मोठा फायदा कंपनीला होईल. 9 सप्टेंबर रोजी सीएनबीसी टीव्ही 18 ला चंद्रा यांनी याविषयीची माहिती मुलाखतीत दिली.
स्वस्त कार येणार
टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र यांनी ही माहिती दिली. Tigor EV पेक्षा ही कार स्वस्त असेल. Tigor EV ची 12.5 लाखांपासून सुरुवात होते. त्यामुळे हॅचबॅक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार उतरवण्याचा कंपनीचा मानस आहे.
50 हजार कार विक्रीचे उद्दिष्ट
टाटा मोटर्सने या आर्थिक वर्षात 50 हजार इलेक्ट्रिक कार विक्रीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
3 वर्षांत 10 पट वाढ
इलेक्ट्रिक चारचाकी वाहन बाजारात गेल्या 3 वर्षांत 10 पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 2 हजार ई-कारची विक्री झाली होती. आता त्यात दहा पट वाढ झाली आहे.
यावर्षी 17,000 कारची विक्री
यंदा टाटा मोटर्सने 17,000 कारची विक्री केली आहे. पुढील वर्षी कंपनीचे 50 हजार इलेक्ट्रिक कार विक्रीचे उद्दिष्ट आहे.