‘हलाल वस्तू’ वरुन नवीन वाद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी म्हटले तरी काय

Halal Certification | देशात हलाल प्रमाणपत्रावरुन वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारच्या फूड सर्टिफिकेशनवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली. योगी सरकारने याविषयीचा एक आदेश दिला. त्यामुळे देशात पुन्हा या विषयावर चर्चा होत आहे. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयी मत व्यक्त केले आहे.

'हलाल वस्तू' वरुन नवीन वाद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी म्हटले तरी काय
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 9:34 AM

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : भारतात हलाल प्रमाणपत्रावरुन नवीन वाद समोर आला आहे. हलाल प्रमाणपत्रावरुन नवीन वादाचे कारण उत्तर प्रदेशातील सरकराचा निर्णय ठरला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने 18 नोव्हेंबर रोजी हलाल विरोधात एक आदेश दिला आहे. त्यानुसार, या राज्य सरकारने याविषयीच्या फूड सर्टिफिकेशनवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. त्याची देशभर चर्चा होत आहे. हलाल सर्टिफिकेशनविषयी देशात नवीन वादाला फोडणी बसली आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयावर मत व्यक्त केले आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊयात..

वादाला येथून सुरुवात

श्रावण महिन्यात या वादाला सुरुवात झाली. हलाल प्रमाणपत्रावरुन एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हलाल सर्टिफिकेशनचे अन्नपदार्थ वाढण्यात आले होते. त्यावर प्रवाशाने आक्षेप घेतला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की हे अन्नपदार्थ शाकाहारी आहेत. पण श्रावण महिन्यात हे अन्नपदार्थ का वाढले यावरुन वाद झाला.

हे सुद्धा वाचा

हे काम राज्य सरकारला करु द्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगलवारी याप्रकरणी मत व्यक्त केले. अन्नपदार्थांचे प्रमाणिकरण, प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारी संस्थांचे आहे. गैर सरकारी एजन्सींनी प्रमाणपत्र देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी या वादावर थेट बोलणे टाळले असले तरी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने खासगी संस्थांच्या प्रमाणपत्राविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. योगी सरकारने हलाल सर्टिफिकेशन असलेले अन्नपदार्थ, त्यांची साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

काय आहे हलाल प्रमाणिकरण

हिंदू मान्यतांनुसार, शाकाहार आणि मासाहारासंबंधी अनेक मान्यता, प्रथा आहेत. त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मात खाद्यसंस्कृतीनुसार मतप्रवाह आहेत. यामध्ये ‘हलाल’ आणि ‘झटका’ हे दोन प्रकार आहेत. त्यात मुस्लीम धर्मात ‘हलाल’ खाद्यपदार्थाला मान्यता आहे. तर झटका या प्रकाराला मान्यता नाही. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम देशात खाद्यपदार्थ विक्री करताना कंपन्या त्यावर हलाल प्रमाणपत्राचा दावा करत त्याच्या शुद्धतेची हमी घेतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.