Gold Silver Price Today : डॉलरने ठोकले शड्डू! आता सोने काय रंग दाखविणार, आजचा भाव काय

Gold Silver Price Today : डॉलरने शड्डू ठोकल्याने आता सोने आणि चांदी काय रंग दाखविणार हे लवकरच कळेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम या मौल्यवान धातूंमध्ये दिसून येत आहे. आता डॉलरने सात आठवड्यांचा नीच्चांक सोडला असून तो वधारला आहे.

Gold Silver Price Today : डॉलरने ठोकले शड्डू! आता सोने काय रंग दाखविणार, आजचा भाव काय
आजचा भाव किती
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली : अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) धोरणात्मक निर्णयानंतर आता डॉलरची मजबुतीकडे वाटचाल सुरु झाली. डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा झाली नसली तरी तो स्थिर आहे. त्याचा फायदा सोने आणि चांदीला मिळाला. गुंतवणूकदारांना नफा कमविता आला. आता डॉलर अधिक मजबूत झाल्यास त्याचा सोन्याच्या चांदीच्या किंमतींवर (Gold Silver Price Today) मोठा परिणाम दिसून येईल. दोन्ही धातूंचे भाव घसरु शकतात. सध्या वायदे बाजारात एप्रिल फ्युचरसाठी सोन्याचा 59,310 रुपये प्रति तोळा भाव ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात 0.58 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज शनिवारी आणि रविवार इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड दोन दिवस भाव जाहीर करणार नाही. ही संस्था देशात 1919 पासून भाव जाहीर करते.

काल, इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जाहीर केल्यानुसार, शुद्ध सोन्याचा भाव संध्याकाळी 59,653 रुपये प्रति तोळा होता. तर 22 कॅरेट सोने 59,414 रुपये तोळा होते. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव अगदीच कमी म्हणजे अवघा 34,897 रुपये प्रति तोळा होता. तर शुद्ध चांदीचा भाव प्रति किलो 69,756 रुपये होता.

भावात पुन्हा वाढ

हे सुद्धा वाचा

आज 25 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भाव वधारले. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ होऊन भाव 55,150 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली. हा भाव सकाळच्या सत्रात 60,150 रुपये होता. चांदीचे भाव पण वधारले आहेत. आज चांदीत 400 रुपयांची वाढ झाली. एका किलो चांदीचा भाव आज 73,000 रुपये होता.

चांदी रेकॉर्डच्या जवळ

1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती. त्यानंतर . 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. आज, 25 मार्च रोजी सकाळच्या सत्रात एका किलो चांदीचा भाव 73,000 रुपये होता. आज यापूर्वीचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. चांदी सूसाट असल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

हॉलमार्कची पद्धत 

  1. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो.
  2. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.
  3. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  4. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.
  5. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात.
  6. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात.
  7. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.