Independence Day 2022 | ज्या ईस्ट इंडिया कंपनीने भारताला बनविले गुलाम, आज एका भारतीयानेच खरेदी केली ही कंपनी, वाचा यशाची वित्तंबातमी

Independence Day 2022 | ईस्ट इंडिया कंपनी भारतात ब्रिटिश सत्तेचा नांगर टाकणारी कंपनी, आज हीच कंपनी एका भारतीयाने खरेदी केली आहे.

Independence Day 2022 | ज्या ईस्ट इंडिया कंपनीने भारताला बनविले गुलाम, आज एका भारतीयानेच खरेदी केली ही कंपनी, वाचा यशाची वित्तंबातमी
भारतीय मालकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:55 AM

Independence Day 2022 | संपूर्ण देश आज सोमवारी स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन (Independence Day 2022 News) साजरा करत आहे. हे वर्ष भारतासाठी विशेष महत्वाचे आहे. कारण या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षाची विशेष आठवण रहावी यासाठी गेल्या वर्षभरापासून देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताची वाटचाल अतिशय खडतर असली तरी मोठ्या हिंमतीने आणि आत्मविश्वासाने भारताने आगेकूच केली आहे.  या 75 वर्षांत भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे. भारताला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने (East India Company) गुलाम केले होते. आज एक भारतीय उद्योगपती त्या कंपनीचा मालक आहे, अवघ्या 75 वर्षे वयोमान असलेल्या भारताने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये चांगला दबदबा निर्माण केले आहे.

दोन शतके भारतात कंपनीची राजवट

ईस्ट इंडिया कंपनीचे नाव कोणाला माहिती नाही? 8वी-10वीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकातून या कंपनीचा काळाकुट्ट इतिहास आपण वाचला आहे. एवढंच काय जी व्यक्ती शाळेत कधीच गेली नाही, तिला ही ईस्ट इंडिया कंपनी माहिती आहे, कारण या कंपनीमुळेच या देशात ब्रिटिशांना 150 वर्षे सत्ता काबीज करता आली. 17व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन 1600च्या सुमारास भारताच्या भूमीवर या कंपनीने पहिले पाऊल टाकले. तेव्हापासून या कंपनीने आपल्या देशावर शेकडो वर्षे राज्य केले. इ.स. 1857 पर्यंत भारतात या कंपनीचा ताबा होता, हा काळ कंपनी राज म्हणून इतिहासात आपण वाचला आहे.

आता ई-कॉमर्स कंपनी

एका अर्थाने ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती. ती भारतीय नव्हती, तर ब्रिटिशांच्या मालकीची कंपनी होती. या कंपनीने भारताला गुलामगिरीच्या बेड्याही घालायला लावल्या. एकेकाळी ही कंपनी शेतीपासून ते खाणकाम आणि रेल्वेपर्यंतची सगळी कामं करायची. भारताला गुलाम बनवणाऱ्या या ईस्ट इंडिया कंपनीची मालकी भारतीय माणसाकडे असल्याचे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक म्हणजे भारतीय वंशाचे व्यावसायिक संजीव मेहता (Sanjeev Mehta) हे आहेत. मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीला खरेदी केल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले. सध्या ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट आदी उत्पादनांची ऑनलाइन विक्री करते.

हे सुद्धा वाचा

ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वतःचे सैन्य

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. ही कंपनी निर्माण करण्यामागचा एकमेव उद्देश ब्रिटिश साम्राज्यवाद आणि स्वदेशीकरणाला चालना देणे हा होता. ब्रिटिश सत्तेचा सूर्य कधीही मावळत नाही, अशी म्हण त्यावेळी प्रसिद्ध होती. या म्हणीला प्रत्यक्षात बळकटी देण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने केले होते. ही कंपनी मुळात व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. पण तिला अनेक विशेषाधिकार देण्यात आले होते. या कंपनीकडे स्वतःचे बलाढ्य सैन्य ही होते.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.