भारतापेक्षा या दहा देशांच्या अर्थव्यवस्थेत यंदा वेगाने वाढ, कोण आहेत हे देश ?
कोरोना साथीच्या संकटामुळे चीनसह अनेकांची अर्थव्यवस्था चांगलीच गोत्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनच्या तोडीची झाली आहे. आता भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. तरीही जगातील दहा देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग भारतापेक्षा जास्त आहे.
मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : चीनसह जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून अद्याप बाहेर पडलेली नाही. परंतू भारताची अर्थव्यवस्था जागतिक महासत्ताच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. परंतू जर सर्वच देशांचा विचार केला तर जगात दहा देश असे आहेत ज्यांचा जीडीपी या वर्षी भारतापेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. यापैकी अनेक देश खूपच लहान आहेत. या देशामध्ये मकाऊ, गियाना, पलाऊ, नायजर, सेनेगल, लिबिया, रवांडा, आयव्हरी कोस्ट, बुर्कीना फासो आणि बेनिन यांचा समावेश आहे. टॉप 20 मध्ये आशियातील पाच देश असून त्यात मकाऊ, भारत, बांग्लादेश, फिलीपाईन्स आणि व्हिएतनामचा समावेश आहे.
आयएमएफच्या मते साल 2024 मध्ये मकाऊचा जीडीपीचा वेग जगात सर्वाधिक 27.2 टक्के रहाण्याचा अंदाज आहे. मकाऊ चीनचे विशेष स्वायत्त क्षेत्र आहे. साल 1999 पर्यंत ते पोर्तुगालच्या अंमलाखाली होते. 118 किमी परिसरात पसरलेला हा छोटासा देश आपल्या कसिनो आणि मॉल कल्चरमुळे ओळखला जातो. या देशाला आशियाचे लास वेगास म्हटले जाते. साल 2021 च्या आकडेवारीप्रमाणे या देशाची लोकसंख्या केवळ 6.87 लाख आहे. गियाना या देशाचा जीडीपी या वर्षी 26.6 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तसेच पलाऊची अर्थव्यवस्था 12.4 टक्के, नायजरची 11.1 टक्के आणि सेनेगलची 8.8 टक्के वेगाने वाढण्याचा अंदाज आहे.
येथे पाहा ट्वीट –
The fastest growing economies in 2024:
🇲🇴 Macao SAR: 27.2% 🇬🇾 Guyana: 26.6% 🇵🇼 Palau: 12.4% 🇳🇪 Niger: 11.1% 🇸🇳 Senegal: 8.8% 🇱🇾 Libya: 7.5% 🇷🇼 Rwanda: 7.0% 🇨🇮 Côte d’Ivoire: 6.6% 🇧🇫 Burkina Faso: 6.4% 🇧🇯 Benin: 6.3% 🇮🇳 India: 6.3% 🇬🇲 The Gambia: 6.2% 🇪🇹 Ethiopia: 6.2% 🇰🇭…
— World of Statistics (@stats_feed) October 25, 2023
भारताची अर्थव्यवस्था कुठे ?
या यादीत आफ्रीकी देश सेनेगलचा असून या देशाची अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. रवांडाचा जीडीपी 7 टक्के , आयव्हरी कोस्टचा 6.6 टक्के वाढण्याची शक्यता आहे. बुर्कीना फासोचा जीडीपी 6.4 टक्के आणि बेनिनचा 6.3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. साल 2023 पर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची शक्यता आहे. आपला शेजारील देश बांग्लादेशची अर्थव्यवस्था या वर्षी 6.0 टक्के वेगाने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.